IMPIMP

Corona in Pune | लसीकरणानंतरही पुणे जिल्ह्यात आढळले 7 हजार 636 ‘कोरोना’बाधित

by nagesh
Corona Vaccination in India | india pm modi leadership running most successful and largest vaccination programme world

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –  Corona in Pune | लस घेतल्यानंतरही कोरोनाचा धोका टळला नाही असे आरोग्य विभागाने (Department of Health) वारंवार सांगितले आहे. मात्र, लसीकरणानंतर (vaccination) काही नागरिकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. कोणत्याही नियमांचे पालन अशा नागरिकांकडून करण्यात येत नाही. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून कोरोना लसीचे (Corona vaccine) डोस घेऊनही पुणे जिल्ह्यातील (Corona in Pune) 7 हजार 636 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये पहिला डोस (First dose) घेतलेल्या 5 हजार 466 तर दुसरा डोस घेतलेल्या 2 हजार 170 जणांचा समावेश आहे. लसीकरणानंतर कोरोनाचे लक्षणे सौम्य अथवा अतिसौम्य दिसू शकतात. त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण नगण्य होते, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

जिल्ह्यात 6 ऑगस्टपर्यंत 63.25.579 जणांचे लसीकरण (vaccination) झाले. त्यापैकी 46.85.381 जणांचा पहिला डोस, तर 16.40.198 जणांना दुसरा डोस मिळाला होता. पहिल्या डोस (First dose) झाल्यावरही 5466 जणांना कोरोनाची लागण झाली. दुसरा डोस (second dose) घेतल्यानंतरही 2170 जण कोरोनाग्रस्त झाल्याचे आढळून आले. ‘आपल्याकडे अपेक्षित असे लसीकरण झाले नाही. दोन्ही डोस घेतलेल्यांकडून कोरोना संदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अशा लोकांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसतात. त्यांच्याकडून अन्य लोकांना संसर्गाचा धोका आहे. अमेरिकतेही लसीकरणानंतर सर्व व्यवहार खुले झाले. मात्र, त्यानंतर बाधितांची संख्या वाढली त्यामुळे लस घेतल्यानंतरही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. अमित द्रविड (Dr. Amit Dravid) यांनी सांगितले.

 

‘डिसेंबरमध्ये पहिली लाट ओसरु लागली त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात नागरिक पर्यटनासाठी, वैयक्तिक कामांसाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले. त्याचा परिणाम दुसऱ्या लाटेत झाला. दुसरी लाटही आता ओसरू लागली आहे. त्यामुळे तिसरी लाट टाळायची असेल तर कोरोना नियम पाळणे आवश्यक असल्याचे जनरल फिजिशियन डॉ. अनिकेत देशपांडे (General Physician Dr. Aniket Deshpande) यांनी सांगितले.

 

पॉझिटिव्ह रुग्ण : (Positive patients) –

पहिल्या डोसनंतर : (First dose) –

पुणे – 2162
पिं. चिं. – 65
ग्रामीण – 3239
एकूण – 5466

 

 

दुसऱ्या डोसनंतर : (second dose) –

पुणे – 1251
पिं. चिं. – 23
ग्रामीण – 896
एकूण – 2170

 

Web Title : Corona in Pune | 7636 positive even after vaccination pune district however rate hospitalization negligible

 

हे देखील वाचा :

Sandwich Pregnancy | सँडविचमुळे महिला झाली प्रेग्नंट? खाताच केली प्रेग्नंसी टेस्ट तर निघाली 5 महिन्यांची गरोदर

Kidney Transplant | व्यक्तीच्या शरीरात आहेत 5 किडनी; डॉक्टरांनी केला असा चमत्कार जाणून हैराण व्हाल तुम्ही !

Pune Police | सराईत गुंडावर MPDA कायद्याखाली कारवाई, गुंड योगेश गायकवाडची येरवड्यात रवानगी

 

Related Posts