IMPIMP

Murder in Chakan | पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाचा खून, पत्नीच्याही खूनाचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime News | Attempt To Murder Kill Incident At Yerwada Gunjan Chowk

चाकण : सरकारसत्ता ऑनलाइन –  पत्नीसोबत अनैतिक संबंध (Immoral Relationship) असल्याच्या संशयावरुन पतीने एकाचा खून केला. तर पत्नीच्याही खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चाकण (Murder in Chakan) येथे घडली आहे. याप्रकरणी आरोपी पतीवर चाकण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.10) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चाकण (Murder in Chakan) येथील नाणेकरवाडी येथील भवानी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अमोल गजानन राणे (वय-38 रा. आळंदी देवाची ता. खेड, जि. पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गणेश मदनलाल गालेच्या (वय-33 रा. बजरंग कॉम्प्लेक्स, प्लॉट नं. बी 101, श्रीराम नगर, चाकण, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी रामेश्वर वामन पवार (वय-35 रा. नाणेकरवाडी ता. खेड) याच्यावर 302,307 कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अमोल राणे आणि आरोपीच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी रामेश्वर याला होता. या कारणावरुन आरोपीने नाणेकरवाडी (Nanekarwadi) येथील भवानी प्रायव्हेट लिमिटेड (Bhavani Pvt. Ltd.) या कंपनीत येऊन
अमोल राणे यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने अमोल यांचा
मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने त्याच्या पत्नीला लोखंडी स्टूलने डोक्यात, तोंडावर, पाठीवर मारुन
गंभीर जखमी केले. आरोपीने अमोल राणे यांचा खून करुन पत्नीच्याही खूनाचा प्रयत्न केला. पुढील
तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड (Assistant Inspector of Police Gaikwad,
Chakan Police Station) करीत आहेत.

 

Web Title : Murder in Chakan | Murder of one on suspicion of immoral relationship with wife, attempted murder of wife also

 

हे देखील वाचा :

Pune Crime | 16 वर्षीय मुलानं बापाचा केला खून, खेड तालुक्यातील खळबळजनक घटना

SBI मध्ये उघडा ‘हे’ विशेष खाते, जेव्हा शक्य होईल तेव्हा जमा करा पैसे; मिळेल चांगले व्याज

EPF दर महिन्याला पैसे जमा केल्यास देते 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त, केवळ करावे लागेल ‘असं’ प्लॅनिंग; जाणून घ्या

 

Related Posts