IMPIMP

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

by pranjalishirish
Girls Marriage Age | for this is reason central government increasing girls marriage age from 18 to 21- PM Narendra Modi

पुणे : मागिल वर्षी कोरोनामुळे Corona लग्न रखडले आता कुठे लग्नसराई सुरू झाली, लग्नाची तारीख काढली. मंगल कार्यालये बुक केले आणि पत्रिकाही छापल्या. पण लग्नासाठी आवश्‍यक असलेले कपडे, सोने, भांडी-बासने आदींची खरेदी राहिली. तितक्यात कोरोनाचा भडका उडाल्याने सरकारने मिनी लॉकडाऊन लागू केले. त्यामुळे लग्नाची खरेदी करायची कशी, असा प्रश्‍न पुणे शहरातील उपनगरे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पडला आहे. उपनगरांमध्ये मयतीलाही नवा कपडा मिळेनासा झाला आहे. काहींची लग्न जमत नव्हती, त्यातून लग्न जमली. मात्र, कोरोनाने पुन्हा घात केला आणि लग्न रखडले, अशी संतप्त प्रतिक्रिया काही लग्नाळू मंडळींकडून व्यक्त केली जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

वर्षभर रखडले आणखी सहा महिने लग्नसमारंभ रखडले तरी चालतील पण कोरोना Corona गेल्यावरच लग्न करू अशीही काहींची मानसिकता बदलली आहे. खरेदीअभावी लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. उपनगरे आणि ग्रामीण भागात इमारतींची बांधकामे चालू ठेवण्यास परवानगी दिली. पण बांधकामासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी आवश्‍यक असलेली हार्डवेअरची दुकाने बंद आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मजुरांमध्ये उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड येथील मजुरांचा मोठ्या संख्येने समावेश आहे.

अयोध्येनंतर आता काशीच्या मशिदीत पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण

कोरोनामुळे Corona  लॉकडाऊनच्या भीतीने हे मजूर मोठ्या संख्येने आपापल्या राज्यात परतू लागले आहेत. त्यामुळे बांधकाम साहित्य आणि मजुरांअभावी ग्रामीण भागातील बांधकामे बंद आहेत. कोरोनाचा भडका आणि ग्रामीण भागात सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. उकाडा वाढल्याने पंखे दुरुस्ती, नवीन पंखे बसविणे, त्यासाठी पंख्यांची खरेदी करणे आदी कामे ठप्प झाली आहेत. यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर, कामगार, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांची संख्या मोठी आहे. या निरक्षर नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे त्यांना ऑॅनलाइन मोबाईल रिचार्ज करता येत नाही, अशी परिस्थिती दुसरीकडे निर्माण झाली आहे.

शरद पवारांची केंद्र सरकारसोबत चर्चा, केंद्र सरकारने दिले ‘हे’ आश्वासन

दरम्यान, मंगल कार्यालयांनी नोंदणी रद्द केली असली तरी, काहींनी लग्न नियोजित तारखेलाच करण्याचे ठरविले आहे. यासाठी रात्रीच्यावेळी मागच्या दाराने दुकानात प्रवेश करून कपडे आणि सोने खरेदी करू लागले आहेत. यासाठी बंद दुकानासमोर एक कामगार बसवून, त्याच्यामार्फत इच्छुक ग्राहक हेरले जात आहेत. या ग्राहकांचा संपर्क क्रमांक घेऊन, त्यांना खरेदीसाठी रात्री बोलावून घेण्यात येत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.

‘खंडणीचे आरोप निराधार, माझी नार्को टेस्ट करा’ ! परब यांचे आव्हान

हार्डवेअर दुकाने बंद असल्याने बांधकाम साहित्य मिळत नाहीत. शेतीउपयोगी साहित्य खरेदी करता येईना. रिचार्जअभावी अनेकांचे मोबाईल बंद पडले. इलेक्ट्रिकल दुकाने बंदमुळे पंखे दुरुस्त करता येईनात. नवीन पंखेही खरेदी करता येईनात, अशी परिस्थिती ग्रामीण भागातील नागरिकांची झाली आहे. कोरोना महामारी भयावह आहे. मात्र, त्यावर प्रशासनानेच योग्य निर्णय घेवून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामान्यांकडून होत आहे.

Read More : 

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

Jayant Patil : भाजप बोलतेय तशीच चौकशी NIA कडून सुरु, सचिन वाझेचा म्होरक्या कोण?

सचिन वाझेंच्या पत्रावरून फडणवीस म्हणाले; ‘पत्र गंभीर…

Chandrakant patil : ‘केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय’

संभाजी भिडे यांची जीभ घसरली, म्हणाले – ‘कोरोना अस्तित्वात नाही, जे जगायचे ते जगतील अन् मरायचे ते मरतील’

महाराष्ट्रापेक्षा गुजरातला लसीचा पुरवठा अधिक, राजेश टोपेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

‘महाराष्ट्राला सर्वात जास्त लसी मिळायला हव्यात, मात्र मुद्दाम दिल्या जात नाहीत’, जयंत पाटलांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

Related Posts