IMPIMP

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार यश दत्ता होळेकर व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 83 वी कारवाई

by nagesh
Pune Crime | MCOCA on the Asif Khan gang of Kondhawa; Pune Police Commissioner Amitabh Gupta's 114th MCOCA action to date

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरात (Pune Crime) कायदा सुव्यवस्था (Pune Law and Order) टिकून ठेवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त
अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Action) Mokka बडगा कायम ठेवत
आतापर्यंत 83 टोळ्याविरुद्ध कारवाई केली आहे. पुण्यातील (Pune Crime) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या (Chaturshrungi Police Station) हद्दीत
दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार यश दत्ता होळेकर (Yash Datta Holekar) व त्याच्या टोळीतील 5 जणांवर पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त
अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 83 आणि चालु वर्षात 20 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

टोळी प्रमुख यश दत्ता होळेकर (वय-21 रा. विमाननगर, पुणे), टोळी सदस्य शुभम शिवाजी खंडागळे Shubham Shivaji Khandagale (वय-21), विनायक गणेश कापडे Vinayak Ganesh Kapade (वय-20), साईनाथ विठ्ठल पाटोळे Sainath Vitthal Patole (वय-23) आणि दोन विधीसंघर्षीत बालके (सर्व रा. एसआरए बिल्डिंग, विमाननगर) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. आरोपींनी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी परिसरात दहशत निर्माण केली आहे. या टोळीविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र त्यांच्यामध्ये काहीच सुधारणा झाली नाही.(Pune Crime)

 

यश होळेकर व त्याच्या साथीदारांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दगडफेक, आरडा-ओरडा करुन दहशत निर्माण करणे, कोयत्याने गाड्यांच्या काचा फोडून नुकसान करणे, खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), जबरी चोरी (Robbery), वाहन चोरी (Vehicle Theft), खंडणी (Ransom), मारामारी अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे केले आहेत.

 

आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे (Senior Police Inspector Rajkumar Waghchavre), पोलीस निरीक्षक गुन्हे दादा गायकवाड (Police Inspector Dada Gaikwad) यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड (API Ratnadeep Gaikwad), समीर चव्हाण (API Sameer Chavan) यांनी परिमंडळ 4 पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar)
यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला.
या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी बुधवारी (दि.15) मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
पुढील तपास खडकी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे (Khadki Division ACP Aarti Bansode) करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आयुक्तांची 83 वी मोक्का कारवाई
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.
शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 83 तर चालु वर्षात 20 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune Crime | 83rd action of Commissioner Amitabh Gupta till date ‘Mocca’ against Yash Datta Holekar and his gang

 

हे देखील वाचा :

Vidhan Parishad Election 2022 | ठाकरे सरकारमध्ये फोडाफोडी ! काँग्रेसकडून थेट शिवसेनेच्या आमदारांना फोन

Dak Mitra Seva | CSC चालवणारे आता करू शकतील Post Office चे ‘हे’ काम, त्यांचे वाढेल उत्पन्न आणि लोकांना मिळेल सुविधा

Ajit Pawar | अजित पवारांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनाही भरते धास्ती

 

Related Posts