IMPIMP

Pune Crime | शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांची कोट्यवधींची फसवणूक; पुणे जिल्ह्यातील प्रकार

by nagesh
Pune Crime News | Fraud of youth on official toll free number of finance company; 7.5 lakhs cheated by asking to generate a new credit card PIN

पुणे/नारायणगाव : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जास्त व्याजाने परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी मच्छिंद्र लक्ष्मण मडके (रा. तांबे, ता. जुन्नर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी (Pune Crime) दिली. वारुळवाडी येथील टोमॅटो मार्केट येथे आरोपीने वीनस ट्रेडिंग ग्रुप नावाचे शेअर मार्केटिंग ग्रुप ही खासगी कंपनी सुरू केली होती.

 

फिर्यादी यांनी आरोपी मडके याला टप्प्याटप्प्याने आरटीजीएसद्वारे 34 लाख 50 हजार रुपये दिले होते. दरम्यान, फिर्यादी यांनी मडके याला फोन करून परताव्याबाबत विचारणा केली असता त्याने शेअर मार्केट तेजीत आहे, पैसे वढतील असे सांगितले. मडके याने डिसेंबर 2021 ते मे 2022 या कालावधीत 6 लाख 11 हजार रुपयांचा परतावा फिर्यादी यांना दिला. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यानंतर आरोपीने फोन घेण्यास टाळाटाळ करणे, उडवाउडवीची उत्तरे देणे असा प्रकार फिर्यादी यांच्यासोबत होऊ लागला.
त्यामुळे फिर्यादी यांनी नारायणगाव येथे जाऊन माहिती घेतली असता, आरोपीने अनेकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्या पैशावर मिळणाऱ्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे उघड झाले. मडके याच्यावर नारायणगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | a case of fraud worth crores to narayangaon pune crime news

 

हे देखील वाचा :

Military Recruitment for Woman | पुण्यात महिलांसाठी लष्करी पोलिस भरती मेळावा सुरू

Pune Crime | गुंगीचे औषध देऊन घरगड्यानेच केली तब्बल 24 लाखांची चोरी

Mohandas Sukhtankar Passes Away | ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन

Yuvasena-Sharmila Yewale | पुण्यातील युवासेनेत खदखद कायम; सहसचिव शर्मिला येवले यांच्या पदाला स्थगिती

 

Related Posts