IMPIMP

Pune Crime | कमी किंमतीत UAE चे ‘चलन’ घेण्याचा प्रयत्न, मिळाला धुण्याचा ‘साबण’

by nagesh
Pune Cyber Crime News | Hadapsar Police Station - 21 lakh fraud in the name of giving dealership of Ather Energy

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कमी किंमतीत युनायटेड अरब अमिराती (UAE) देशाचे चलन दिरहम हे विकत घेण्याचा मोह एका तरुणाला चांगलाच महागात पडला. चलनाऐवजी धुण्याच्या साबणाचा गोळा हातात (Pune Crime) पडला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

या प्रकरणी आंबेगाव पठार येथे राहणार्‍या एका २८ वर्षाच्या तरुणाने बिबवेवाडी पोलिसांकडे (bibvewadi police station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना दोघा जणांनी कमी किंमतीत युएई (united arab emirates) देशाचे चलन दिरहम हे देण्याचा बहाणा केला. त्यानुसार त्यांना २ लाख रुपये घेऊन अप्पर कोंढवा रोडवरील (Kondhwa Raod) जगताप डेअरी (Jagtap Dairy) येथील साईनगर गल्लीत (Sai Nagar) बोलविले. त्यानुसार ते १६ सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजता पैसे घेऊन तेथे गेले. त्यांच्याशी मोबाईलवर बोलणारा एक जण व त्याचा साथीदार तेथे आला. त्यांनी फिर्यादीकडे नायलॉनची पिशवी दिली. त्यांनी नायलॉनच्या पिशवीतील गठ्ठा सोडून पाहण्याचा प्रयत्न करताच त्यांच्या हातातून ५०० रुपये व २ हजार रुपयांचे नोटा असलेली २ लाख १ हजार रुपये रोख रक्कम असलेली प्लॉस्टिकची पिशवी जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यांना हाताने धक्का देऊन जमिनीवर पाडून ते पळून गेले.

फिर्यादी यांनी नायलॉनच्या पिशवीतील गठ्ठा उघडून पाहिला असता त्यात व्हिल कंपनीचे कपडे धुण्याचे साबणाला गोलाकार देऊन त्यावर इंग्रजी व मराठी वर्तमानपत्र गुंडाळून दोन हात रुमालाने बांधलेला होता. आपली फसवणूक (Cheating) झाल्याचे लक्षात आल्यावरही ते घाबरले असल्याने त्यांनी तक्रार (Pune Crime) दिली नव्हती. शेवटी काल त्यांनी तक्रार दिल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी (bibvewadi police station) फिर्याद दाखल केली असून सहायक पोलीस निरीक्षक उसगावकर अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Attempt to get UAE currency at low price, got washing soap

 

हे देखील वाचा :

FB Account Cloning | Facebook वर ‘या’ नावानं फ्रेन्ड रिक्वेस्ट आली तर राहा सावध, अन्यथा बसेल मोठा फटका; जाणून घ्या

Crime News | मुंबईत गणपती विसर्जनदिनी 5 मुले बुडाली; पुण्यात इंद्रायणी नदीत 2 जण बुडाले

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत घसरणीचा ‘कल’ कायम ! 10,000 रुपयांनी ‘स्वस्त’ मिळतंय एक तोळा, जाणून घ्या नवीन दर

 

Related Posts