IMPIMP

Pune Crime | दारु पिण्यास पैसे न दिल्याने टोळक्याने कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; सराईत गुंडाची जनता वसाहतीत दहशत?

by nagesh
Pune Crime | Damage to houses due to rock blasts due to mine blast for riverine wells; The water tank burst in the incident in Kharadi, some people were injured due to stones

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | रस्त्याने जाणार्‍या तरुणांनी दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने गुंडाच्या टोळक्याने कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मुलांना जीवे मारण्याची धमकी (Pune Crime) देऊन दहशत माजवली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police) केट्या ऊर्फ अमित थोपटे (वय ३०), सुरज प्रभाकर झिंटे (वय ३०) या रेकॉर्डवरील गुंडांना (Pune Criminals) अटक करण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

त्याचे साथीदार अमोल थोपटे व गणेश मोडावत यांच्यावर खूनाचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सौरभ दत्तु सरवदे (वय २२, रा. जनता वसाहत) याने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे. सौरभ सरवदे व त्याचा मित्र अनिस ऊर्फ मुन्ना सय्यद हे ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता जनता वसाहत येथील (Janta Vasahat Pune) वाघजाई मंदिराच्या परिसरातून पायी जात होते. त्यावेळी केट्या याने त्यांना अडविले. त्यांच्याकडे दारु पिण्यासाठी १ हजार रुपये मागितले. फिर्यादी पैसे न देता पळून जाऊ लागले. तेव्हा आरोपींनी त्यांचा पाठलाग करुन कोयते फेकून मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केला.

 

तसेच रस्त्याच्या कडेला थांबलेली मुले यांना मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ करुन दहशत निर्माण केल्याने मुले पळून गेली.
आरोपींच्या दहशतीमुळे त्यांनी आजवर फिर्याद दिली नव्हती. शेवटी बुधवारी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल (Pune Crime) करुन दोघा गुंडांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक खरात (Police Sub Inspector Kharat) तपास करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Attempt To Kill Incident in Janta Vasahat of Pune Dattawadi Police Station Limits

 

हे देखील वाचा :

Amol Palekar | प्रकृती खालवल्यानं अभिनेते अमोल पालेकर पुण्यातील रूग्णालयात दाखल

MLA Nitesh Rane | जामीन मिळाल्यानंतर आमदार नितेश राणेंची प्रकृती सुधारली; कोल्हापूरच्या CPR मधून डिस्चार्ज मिळणार

Tripura High Court | हायकोर्टचा निर्णय ! वडिलांच्या उत्पन्नावर अवलंबित विवाहित मुलगी सुद्धा मृतक कोट्यांतर्गत नोकरीसाठी पात्र, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

 

Related Posts