IMPIMP

Pune Crime | भाडे वसुल करुन मालकाला नोकरांनी लावला सव्वा कोटीला चुना

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station - Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | ३० वर्षाहून अधिक काळ नोकर म्हणून काम करणार्‍यावर विश्वासाने व्यावसायिक गाळ्यांचे भाडे वसुल करण्याचे काम दिले असताना त्याने दुसर्‍या कामगाराशी संगनमत करुन तब्बल १ कोटी २० लाख २८ हजार रुपयांना गंडा (Cheating Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी शरद दिगंबर काळभोर Sharad Digamber Kalbhor (वय ५७, रा. काळभोरनगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३५८/२२) दिली आहे. त्यानुसार संतोष यशवंत मयेकर Santosh Yashwant Mayekar आणि साईल संतोष मयेकर Sail Santosh Sayekar (दोघे रा. ताम्हाणेवस्ती, तळवडे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०२१ दरम्यान सहयोगनगर येथे घडला. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष मयेकर हा फिर्यादी काळभोर यांच्याकडे १९९० पासून नोकर म्हणून कामाला होता. काळभोर भोंडवे याचे मालकीचे तळवडे येथील गट नंबर १६५ मधील नंदादीप इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समध्ये एकूण ३९ व्यावसायिक गाळे आहेत. फिर्यादी यांनी या व्यावसायिक गाळ्यांचे भाडे वसुलीचे काम संतोष मयेकर याला दिले होते. त्याने फिर्यादी यांच्यावतीने भाडेकरु यांच्याकडून रोख तसेच चेक स्वरुपात भाडे वसुल केले. भाडे त्याने फिर्यादी यांना न देता या रक्कमेचा अपहार करुन ही रक्कम परस्पर स्वत:चे व साईल मयेकर यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली. फिर्यादी यांचा विश्वासघात करुन आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांची १ कोटी २० लाख २८ हजार २५० रुपयांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक मुळीक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime | Cheating Case Chikhali Police Station Crime news

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Crime | कॉलेजची फी भरण्यासाठी कर्ज मिळविण्याच्या प्रयत्नात तिच्या वाट्याला आली बदनामी; लोहगावमधील 21 वर्षीय तरूणीसोबत घडलेला प्रकार

Maharashtra Politics | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना टॅग करून संजय राऊतांनी केलं ट्विट, म्हणाले – ‘…अब सभी को सभी से खतरा है’

Rain In Maharashtra | पालघर, पुणे, नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, पुढील 4 दिवस सतर्क रहा

Shivsena Uddhav Thackeray | शिवसेनेला मोठा धक्का? मातोश्रीवरील बैठकीला लोकसभेतील 7 खासदारांची दांडी

Aditya Thackeray – Aarey Protest | राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची मुंबई पोलिसांना नोटीस ! आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा

 

Related Posts