IMPIMP

Pune Crime | गोयल गंगा बिल्डरला 10 लाखांच्या खंडणीची मागणी; उत्सवासाठी वर्गणी घेऊन वैयक्तिक कामासाठी वापर करणाऱ्या जागा मालकासह 15 जणांवर गुन्हा दाखल

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | महंमदवाडी येथील जागा विकत घेतल्यानंतर उत्सव, मंदिर बांधकाम (Temple Construction) अशा कारणासाठी वर्गणी घेऊन तिचा वापर वैयक्तिक कामासाठी केला. त्याची विचारणा केल्यानंतर १० लाख रुपयांची खंडणी (Ransom) प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गोयल (Goyal Ganga Builder) यांना मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संजय गुलाब घुले (Sanjay Gulab Ghule) याच्याविरूद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी गोयल गंगा बिल्डरच्या वतीने अनुज उमेश गोयल Anuj Umesh Goyal (वय ३९, रा. सन माहु बिल्डिंग, बंडगार्डन रोड) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी (Pune Police) संजय गुलाब घुले (रा. महंमदवाडी), पुष्पा मंदीरे (Pushpa Mandire), रजिया शेख (Razia Sheikh), अनिता साळवी (Anita Salvi), चेतन भोंडवे (Chetan Bhondwe), उषा कामधेनु (Usha Kamadhenu) व इतर ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ फेब्रुवारी ते ६ एप्रिल २०२२ दरम्यान महंमदवाडी (Mahammadwadi) येथे घडली आहे. (Pune Crime)

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुज गोयल हे बांधकाम व्यावसायिक (Builders In Pune) आहेत. संजय घुले याने त्याच्या मालकीची महंमदवाडी येथील जमीन फिर्यादी यांच्या श्री बालाजी रियालटी (Shree Balaji Realty) या बांधकाम संस्थेस विकली आहे. त्या जागेवर सध्या बांधकाम सुरु आहे. जमिनीचा पूर्ण मोबदला त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना मिळाला आहे. असे असताना संजय घुले हा उत्सव, मंदिर बांधकाम अशा वेगवेगळ्या कारणाने दर ६ महिन्यांनी वर्गणी स्वरुपात पैसे घेऊन ते सामाजिक कामात न वापरता वैयक्तिक कामात वापरले. फिर्यादी यांच्याकडे १० लाख रुपयांची खंडणी स्वरुपात मागणी केली. फिर्यादी यांनी ती न दिल्याने आरोपींनी गोयल यांच्या बांधकाम साईटवर जाऊन तेथील सुरक्षा रक्षक व बांधकाम विकसक यांना दमदाटी व शिवीगाळ केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title : Pune Crime | Demands Rs 10 lakh ransom from Ganga builder ; Filed a case against 15 persons including the owner of the place who used it for personal work by taking subscription for the festival

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात ‘तेजी’, चांदी ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | दुबईहून पुणे विमानतळावर आलेल्या प्रवाशांकडून 466 जिवंत प्रवाळांचे नमुने जप्त; सीमा शुल्क विभागाची कारवाई

MSEDCL | …म्हणून सोमवारी पहाटे दोन तास विमाननगर, नगररोड, येरवड्यामध्ये वीज बंद

World Health Day | भाजपा महिला मोर्चा आणि बेनकेअर हॉस्पिटल यांच्या वतीने ‘जागतिक आरोग्य दिन’ उत्साहात साजरा

 

Related Posts