IMPIMP

Pune Crime | लग्न समारंभात अडथळा आणण्याची धमकी देऊन लोकांना लुबाडणार्‍या पीपीएल कंपनीवर खंडणीचा गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | A case of fraud has been registered against builders Mahesh Thorat and Shirish Lodha in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | डिजे पार्टी, गेट दु गेटर पार्टीमध्ये वाजविल्या जाणार्‍या गाण्यांच्या रॉयल्टी वसुल करण्याचा आपल्याला अधिकार असल्याचे सांगून लग्न समारंभातही आमची परवानगी घ्यावी लागेल, नाही तर लग्नात अडथळा आणू अशी धमकी देऊन लोकांना लुबाडणार्‍या कंपनीवर अखेर गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

फोनोग्राफीक परफॉर्मन्स लि. phonographic performance ltd (PPL) व नोव्हेक्स कम्युनिकेश प्रा. लि. या (novex communications pvt ltd) कंपनीचे संचालक, पदाधिकारी, कंपनीचे फिल्ड ऑफिसर्स व इतर संबंधित व्यक्तीवर कोरेगाव पार्क पोलिसांनी (koregaon park police ) गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी निखिल प्रमोद करमचंदानी (वय ३०, रा. मोतीबाग, गणेशखिंड रोड) यांनी फिर्याद दिली आहे.
करमचंदानी यांचे अप्पा बळवंत चौक (appa balwant chowk) येथे व्हिनस ट्रेडर्स (venus traders abc chowk) हे प्रसिद्ध दुकान आहे.
त्यांच्या नातेवाईकाचे हॉटेल बंडगार्डन येथील हॉटेल कॉनरॉड (hotel conrad pune) येथे गेल्या महिन्यात विवाह समारंभ होता.
फोनोग्राफीक परफॉर्मन्स लि. व नोव्हेक्स कम्युनिकेश या कंपनीच्या पदाधिकार्‍यांनी कट रचून त्यांना आमच्या कंपनीची एनओसी/ लायसन्स (NOC) घ्यावे लागेल.
नाही तर लग्नसमारंभात अडथळा आणण्याची व कारवाई करण्याची धमकी दिली.
त्यांनी कंपनीचे एनओसी, लायसन्स करता ४४ हजार ८०० रुपये असे ८९ हजार ६०० रुपये घेतले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

तसेच राहुल शिरोडकर यांच्या कडून ४७ हजार ४०० रुपये असे एकूण १ लाख ३७ हजार रुपये खंडणी स्वरुपात वसुल केले.
एनओसी/ लायसन्सवर लग्नसमारंभ असा उल्लेख न करता डि जे पार्टी, गेट टुगेदर पार्टी असा उल्लेख करुन त्यांची फसवणूक केली आहे.
या कंपन्यांनी इतर लोकांचे सुद्धा वेगवेगळ्या तारखेला हॉटेल कॉनरॉड येथे व इतर वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये असलेल्या लग्नसमारंभाची एनओसी /लायसन्स देण्याच्या नावाखाली समारंभात अडथळा आणण्याची व कारवाई करण्याची धमकी देऊन मोठ्या प्रमाणावर पैसे उकळलेले (Pune Crime) आहेत.

समारंभात वाजविल्या जाणार्‍या गाण्याची रॉयल्टी आमच्याकडे असून संबंधितांना आम्ही त्यांची रॉयल्टी देतो, ती वसुल करण्याचा आमच्याकडे परवाना आहे, असा दावा करुन या कंपन्या अनेक ऑकेस्ट्रा व इतर गाण्याचे कार्यक्रम करणार्‍या आयोजकांनाही त्रास देत असतात.
पोलिसांनी आता त्यांच्यावर कारवाई केल्याने अशा खंडणीखोरीला आळा बसण्याची शक्यता आहे.

 

Web Title : Pune Crime | extortion case filed against phonographic performance ltd (PPL) and novex communications pvt ltd for threatening to disrupt wedding ceremony

 

हे देखील वाचा :

Yogesh Tilekar | ओबीसींचा इंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी आयोगाला सरकारने तातडीने निधी द्यावा; भाजपा ओबीसी आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांची मागणी

Tata Tigor | केवळ 4,111 रुपयांच्या EMI वर घर घेऊन या Tata ची ही शानदार कार, जाणून घ्या पूर्ण ऑफर

Earn Money | 1 लाख रुपयात सुरू करा ‘हा’ बिझनेस, दरमहिना होईल 40000 पेक्षा जास्त नफा; 80% सरकार करेल मदत

 

Related Posts