IMPIMP

Pune Fire News : लक्ष्मी पूजनाला फटाक्यांच्या अतिषबाजीने सहा ठिकाणी आगीच्या घटना, बी टी कवडे रस्त्यावर 8 दुचाकी जळाल्या

by nagesh
Pune Fire News : Firecrackers on Lakshmi Poojan fire at six places, 8 bikes burnt on BT Kavade road

पुणे : (Pune Fire News) : सरकारसत्ता ऑनलाइन शहरात लक्ष्मी पुजनानंतर (Laxmi Pooja) ठिकठिकाणी करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने दोन तासात सहा ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत.  प्रामुख्याने बी टी कवडे रस्त्यावर लागलेल्या आगीत ८ दुचाकी जळल्या आहेत. इतर ठिकाणी किरकोळ स्वरूपाची आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, अशी माहिती अग्निशमन दलाचे जवान निलेश महाजन यांनी दिली. (Pune Fire News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दिवाळीनिमित्त आज संध्याकाळी सात ते रात्री नऊ  वाजेपर्यंत आगीच्या सहा घटना घडल्या आहेत. त्यामध्ये जनता वसाहत, गल्ली क्रमांक ४७ येथे झाडाला आग लागली होती.

 

तर  काञज, आंबेगाव पठार, साईसिद्धि चौक गॅलरीसह बी टी कवडे रस्ता, बीटाटेल इनक्लेव्ह सोसायटीत लागलेल्या आगीत ८ दुचाकी पेटल्या होत्या. नऱ्हेतील माताजी नगर, ज्ञानदेव शाळेच्या छतावर आग लागली होती.
विश्रांतवाडी, सिरीन हॉस्पिटल जवळ झाडासह वारजे माळवाडी, चैतन्य चौक, युनिवर्सल सोसायटीत बंद घरामधे आग
लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली होती. जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण
मिळवले.

 

 

Web Title :- Pune Fire News : Firecrackers on Lakshmi Poojan fire at six places, 8 bikes burnt on BT Kavade road

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | शिवसेना शिंदे गट, मनसेसोबत युती भाजपच्या स्थानीक इच्छुकांना परवडणार?

MLA Ravi Rana | मी त्यांना योग्य वेळ आल्यावर…, आमदार रवी राणांचा बच्चू कडूंना इशारा

POCSO Court | तो 16 वर्षीय मुलीला म्हणाला ‘आयटम’, लैंगिक छळाचे निरीक्षण नोंदवत कोर्टाने सुनावली दीड वर्षांची शिक्षा

Ashish Shelar | ज्यांनी अडीच वर्षात शेतकऱ्यांचे अश्रू पुसले नाहीत, ते आता दौरे करत आहेत, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला

 

Related Posts