IMPIMP

Pune Crime | सुनेच्या आत्महत्या प्रकरणी आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्यासह पती आणि मुलाला अटक

by nagesh
Pune Crime | former alandi nagaradhyaksha vaijayanta umargekar husband and son arrested in daughter in law s suicide case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | आळंदी Alandi (ता. खेड – Khed) च्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर (Vaijayanta
Umargekar) यांच्या सुनेने (Daughter In Law) रविवारी (ता. 10) रात्री आठच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide In
Alandi) केली होती. या प्रकरणी वैजयंता उमरगेकर यांच्यासह त्यांचे पती आणि मुलाला अटक करण्यात आली आहे. मृत नवविवाहितेचे नाव प्रियांका अभिषेक उमरगेकर Priyanka Abhishek Umargekar (वय 29) असे आहे. प्रियांकाचे वडील अनिल घोलप यांनी आळंदी पोलिसात (Alandi Police) तक्रार दाखल केली होती. (Pune Crime)

 

पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) माजी नगरसेविका कमल घोलप (Corporator Kamal Gholap) यांची प्रियांका ही मुलगी होती. नोव्हेंबर महिन्यात प्रियांकाचा विवाह अभिषेक उमरगेकर यांच्यासोबत झाला आणि काही महिन्यातच प्रियांकाने आत्महत्या केली आहे. वैजयंता उमरगेकर, त्यांचे पती अशोक उमरगेकर (वय 60 वर्षे) यांनी सुनेचा छळ केल्याचा आरोप आहे. तसेच मुलगा अभिषेकने (वय 27 वर्षे) याने दोघांना साथ दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अभिषेक याच्याशी नोव्हेंबर 2021 मध्ये विवाह झाला होता.
लग्नामध्ये आलिशान कार जावई अभिषेक याला भेट देत घोलप कुटुंबीयांनी रावेर येथे थाटामाटात विवाह करून दिला होता.
लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यातच प्रियांकाचा सासरच्यांकडून छळ सुरू झाला होता. (Pune Crime)

 

प्रियांकाला लग्नानंतर सासरच्यांनी संसारोपयोगी साहित्य, फर्निचरसाठी तगादा लावला होता. यासाठी ते प्रियांकाचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. शिवाय हुंड्यासाठी पैशांची मागणी केली जात होती, या जाचाला कंटाळून प्रियांकाने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. आळंदी पोलिसांनी तिनही आरोपींना अटक केली आहे.

 

प्रियांका आणि अभिषेक यांच्यात रविवारी (10 जुलै) वाद झाला.
यानंतर बेडरुममध्ये जाऊन प्रियांकाने रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली होती.
पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवला.
शवविच्छेदन अहवालात प्रियांका उमरगेकरने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

 

 

Web Title :- Pune Crime | former alandi nagaradhyaksha vaijayanta umargekar husband and son arrested in daughter in law s suicide case

 

हे देखील वाचा :

Pune Crime | भाडे वसुल करुन मालकाला नोकरांनी लावला सव्वा कोटीला चुना

Pune Cyber Crime | कॉलेजची फी भरण्यासाठी कर्ज मिळविण्याच्या प्रयत्नात तिच्या वाट्याला आली बदनामी; लोहगावमधील 21 वर्षीय तरूणीसोबत घडलेला प्रकार

Maharashtra Politics | एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना टॅग करून संजय राऊतांनी केलं ट्विट, म्हणाले – ‘…अब सभी को सभी से खतरा है’

 

Related Posts