IMPIMP

Rupali Chakankar | ‘मीच तुमच्याकडे तुमच्यावरच्या अश्लील Comment ची तक्रार करतो’; महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना पत्र

by nagesh
Rupali Chakankar | maharashtra women commission president rupali chakankar facebook post about vat purnima facing offensive comments heramb kulkarni reaction

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Rupali Chakankar | वटपौर्णिमेच्या दिवशी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सोशल मिडियावर (Social Media Post) एक पोस्ट केली होती. ‘लग्नानंतर मी एकदाही वड पूजला नाही’ असं त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाला होता. त्यांच्या फेसबुक पोस्टच्या (Facebook Post) खाली अनेक विरोधी मतांच्या लोकांनी टीका करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या. त्यामध्ये अर्वाच्य आणि अश्लीलही प्रतिक्रिया होत्या. हे पाहता शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांनी फेसबुक पोस्ट लिहून रुपाली चाकणकर यांच्याविषयी वादग्रस्त भाषेत टीका करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हेरंब कुलकर्णी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “मा.रुपाली चाकणकर, ‘मीच तुमच्याकडे तुमच्यावरच्या अश्लील comment ची तक्रार करतो आहे.’ महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची काल मी वटपौर्णिमेला वडाला जात नाही अशा प्रकारची एक भूमिका आली. त्यांच्या एका भाषणाच्या आधारे ती पोस्ट बनवली गेली. त्यात त्यांनी महिलांनी वटपौर्णिमेला जाऊ नये असे कुठेही म्हटलेले नाही फक्त मी स्वतः जात नाही हे सांगितले व त्याचवेळी सत्यवानाची सावित्री समाजाला लवकर कळली. सावित्रीबाई अजून कळत नाही किंवा कळायला हवी अशी भावना व्यक्त केली.”

 

पुढे हेरंब कुलकर्णी म्हणाले, “यात खटकण्यासारखे काहीच नव्हते. लोकानुरंजी भूमिका राजकीय पक्ष घेत असताना त्यांनी गोलमाल न बोलता अतिशय धाडसाने हे मांडले. हे अपवादात्मक व कौतुकास्पद आहे. त्यांच्या विविध पोस्ट खालच्या कमेंट आवर्जून बघितल्या तेव्हा अक्षरशः लाज वाटली. मला ते टाकताना लाज वाटते आहे, पण अतिशय अश्लील भाषेत अनेक कमेंट आहे. विशेष म्हणजे चाकणकर यांचे घटनात्मक पद व तात्काळ कारवाईच्या शिफारस करू शकणारे पद असल्याने त्या सर्व विकृत व्यक्तींवर लगेच कारवाई होऊ शकते हे माहीत असूनही अशा कमेंट करण्याची हिंमत केली याचा अर्थ सोशल मिडियावर स्त्रियांच्याबाबत हिम्मत किती वाढली आहे याचे हे त्याचे उदाहरण असल्याचे ते म्हणाले.”

 

दरम्यान, “अमृता फडणवीस यांच्या भूमिका मान्य असो किंवा नसो त्यांच्याबाबतीत अशाच अत्यंत अश्लील भाषेत कमेंट फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून सुरु आहे.
तेव्हा आता महिला आयोगाच्या अध्यक्षावरच नीच अश्लील comment बाबत मी त्यानाच पत्र लिहितो आहे
व सोशल मीडियावर काल त्यांच्याबाबत जे घडले त्यावर त्यांनीच
अध्यक्ष या नात्याने त्यांच्यातील स्त्रीबाबत सायबर सेलला कारवाई चे आदेश द्यावी अशी मागणी करणार आहे.”

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

त्याचबरोबर, “सायबर सेलने इथून पुढे कोणत्याही महिलांवर अशा comment केल्या
तर सु मोटो कारवाई करावी असे आदेश त्यांनी देण्याची गरज आहे.
पुरुष म्हणून मी मागील वर्षी वटसावित्रीवर टीका केली तर मला फक्त पुरोगामी म्हणून शिव्या दिल्या पण एक स्त्री टीका करते.
तेव्हा थेट अश्लील शेरेबाजी होते ही विकृती रोखायला हवी.” असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

Web Title :- Rupali Chakankar | maharashtra women commission president rupali chakankar facebook post about vat purnima facing offensive comments heramb kulkarni reaction

 

हे देखील वाचा :

Mumbai Crime | पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यावसायिकाकडून 35 वर्षीय लेखिकेवर बलात्कार, दाऊद टोळीच्या नावाने महिलेला दिली धमकी

Maharashtra Crime News | धक्कादायक ! मुलानेच जन्मदात्या वडिलांवर कोयत्याने सपासप वार करून केला खून; परिसरात खळबळ

Gopichand Padalkar On Supriya Sule | ओबीसी आरक्षणावर गोपीचंद पडळकरांनी सुप्रिया सुळेंचा व्हिडीओ शेअर करत साधला निशाणा; म्हणाले – ‘एका अर्थी मला आनंद..’

 

Related Posts