IMPIMP

Pune Crime | एकतर्फी प्रेमातून मंगळवार पेठेत तरूणीचा विनयभंग

by nagesh
Pune Crime News | A case of molestation against a goon in Shivajinagar village; Obscene chale with a young woman on the street

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | एकतर्फी प्रेमातून तरुणीकडे जबरदस्तीने लग्नाचा आग्रह धरून स्वत: जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी 22 वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. याबाबत 22 वर्षांच्या तरुणीने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली असून, पोलिसांनी तरुणावर (Pune Crime) विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही घटना 25 नोव्हेंबर रोजी मंगळवार पेठ परिसरात घडली होती. त्यावेळी दोघांच्या घरच्यांनी एकमेकांबाबतीत पुन्हा असे न करण्याची हमी दिल्याने त्यावेळी तक्रार करण्यात आली नव्हती. मात्र, तरुणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल करून अटक केली. (Pune Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तसेच ते एकाच कॉलेजमध्ये शिकले असून, त्यांच्यात मैत्री होती. फिर्यादी तरुणी ही खासगी नोकरी करत असून, 25 नोव्हेंबर रोजी ती दुचाकीवरून ऑफिसला जात होती. त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करून तिला आडवले आणि जबरदस्तीने तिच्या दुचाकीवर बसून तिला कानिफनाथ मंदिर, बोपदेव घाटात घेऊन गेला.

 

फिर्यादी तरुणीची लग्न करण्याची इच्छा नसतानादेखील आरोपीने जबरदस्तीने लग्न करण्याचा आग्रह धरला.
त्यावेळी तरुणीने लग्नाला नकार दिला असता आरोपीने स्वत:च्या जिवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी दिली.
हा प्रकार दोघांच्या घरच्यांना समजल्यावर तरुणाने फिर्यादी यांना सोडून दिले.
दरम्यान, तरुणीने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Molestation Case Mangalwar Peth Pune Faraskhana Police Station Youth Arrest

 

हे देखील वाचा :

Pune PMPML Bus | ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा पुन्हा होणार पूर्ववत

Nick Bollettieri Death | दिग्गज टेनिसपटूंचे कोच निक बोलेटिएरी याचं निधन; सेरेना, विनस विल्यम्स, मारिया शारापोवा आणि आंद्रे अगासीला दिलं होतं प्रशिक्षण

PAK vs ENG Test Match | रावळपिंडी कसोटीत इंग्लंडने पाकिस्तानवर विजय मिळवत केले ‘हे’ 4 वर्ल्ड रेकॉर्ड

Raj Thackeray | ‘आपण महापुरुषांना संकुचित दृष्टिकोनातून पाहतो’; महापरिनिर्वाणदिनी राज ठाकरेंचे जनतेला आवाहन

 

Related Posts