IMPIMP

Pune Crime News | कोंढवा, लोणी काळभोर परिसरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा, 66 जणांवर कारवाई; 1 लाख 23 हजाराचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Police Crime Branch News | Social Security Cell Pune raid on gambling den in Bundagarden area, action taken against 8 persons

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुणे शहर आणि परिसरात अवैधरित्या सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर (Matka Gambling Den) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell, Pune) कारवाईचा बडगा उगारला आहे. कोंढवा (Kondhwa Police Station) आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीत सुरु असलेल्या मटका जुगार अड्यावर छापा टाकून पथकाने 66 जणांवर कारवाई करुन एक लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल (Pune Crime News) जप्त केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सामाजिक सुरक्षा विभागाने सोमवारी (दि.13) लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर गाव येथे मोकळ्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पाळत ठेवून छापा टाकला. त्यावेळी पैशावर जुगार खेळणारे आणि खेळवणाऱ्या 23 जणांना ताब्यात घेऊन 68 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर 24 जणांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत (Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

सामाजिक सुरक्षा विभागाने दुसरी कारवाई शनिवारी (दि.11) कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केली. कात्रज कोंढवा रोडवर मोकळ्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये काही जण कल्याण मटका (Kalyan Matka) जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पाळत ठेवून छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 22 जणांना ताब्यात घेऊन 54 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पुढील कारवाईसाठी कोंढवा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav),
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, अजय राणे,
मनिषा पुकाळे, हणमंत कांबळे, इरफान पठाण, संदिप कोळगे, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Police raid gambling dens in Kondhwa, Loni Kalbhor area, action taken against 66 people; 1 lakh 23 thousand seized

 

हे देखील वाचा :

Amol Kolhe | स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडूच खरे प्रेरणास्थान – अमोल कोल्हे

Valentine’s Day | प्रेमासाठी ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी केली हद्द पार; कोणाकोणाचा आहे समावेश

Yavatmal Crime News | नुकतीच बदली होऊन आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ

 

Related Posts