IMPIMP

Pune Crime | भंडारा डोंगराच्या पायथ्याला असलेल्या लॉजमधील ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक

by nagesh
Mumbai Crime | 5000 girls human trafficking from bangladesh to india for prostituti accused arrested

पुणे / चाकण : सरकारसत्ता ऑनलाइन– पुण्यातील (Pune Crime) भंडारा डोंगराच्या (Bhandar Dongar) पायथ्याला असलेल्या एका लॉजवर चाकण पोलिसांनी छापा टाकून या ठिकाणी सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. चाकण पोलिसांनी (Chakan police) केलेल्या या कारवाईत (Pune Crime) दोन जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.5) दुपारी एकच्या सुमारास करण्यात आली.

गुलाब विठ्ठल जाधव (वय-38 रा. कोटोरवाडी, पोस्ट इंदुरी, ता. मावळ), रिदु खिस्टराज फ्रान्सिस (वय-21 रा. कोहिनूर लॉज, येवलेवाडी, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यातील (Chakan Police Station) महिला पोलीस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण-तळेगाव रोडवर (Chakan-Talegaon road) भंडारा डोंगराच्या पायथ्याला येवलेवाडी गावच्या हद्दीत कोहिनुर लॉज (Kohinoor Lodge) आहे.
या लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पडताळणी करण्यासाठी एका बनावट ग्राहकाला लॉजवर पाठवले.

आरोपींनी ग्राहकाकडून दोन हजार रुपये घेऊन त्यांना लॉजच्या एका खोलीत मुलगी उपलब्ध करुन दिली.
कोहिनूर लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री होताच पोलिसांनी लॉजवर छापा टाकला.
पोलिसांनी लॉज चालवणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा (Pune Crime) दाखल करुन अटक केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे दशरथ वाघमोडे (Police Inspector Dashrath Waghmode) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | prostitute racket exposed in lodge at the foot of Bhandara mountain, two arrested

 

हे देखील वाचा :

IMD Forecast | भारतातून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाची सुरूवात

ZP, Panchayat Samiti Election | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ‘धक्का’ ! नगरखेडा पंचायत समितीत भाजपचं ‘कमळ’ फुललं

Palghar ZP Election Result | पालघरमध्ये शिवसेनेला धक्का ! खासदाराच्या मुलाला पराजित करत भाजपची ‘बाजी’

 

Related Posts