IMPIMP

Pune Crime | दुचाकी आणि अ‍ॅल्युमिनीयमच्या पट्ट्या चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांकडून अटक; 2 लाखाचा मुद्दमाल जप्त

by nagesh
Pune Crime | Pune Khadak police arrest criminalfor stealing two wheeler and aluminum straps Property worth Rs 2 lakh confiscated

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या (Bike thieves) आणि दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या अ‍ॅल्युमिनीयमच्या पट्ट्या (Aluminum Straps) चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक (Arrest) करण्यात आली आहे. खडक पोलिसांनी (Khadak Police Station) आरोपीला स्वारगेट येथील वेगा सेंटर (Vega Center Swargate) समोरील बोळात सापळा रचून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून दुचाकी आणि अ‍ॅल्युमिनीयमच्या पट्ट्या असा एकूण 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करुन 5 गुन्हे उघडकीस (Pune Crime) आणले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जैद ऊर्फ लंगडा जमीर दलाल (वय -20 रा. 329, घोरपडे पेठ, अल्हद सोसायटी चौथा मजला मोमीनपुरा कब्रस्तानच्या समोर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहरातील (Pune Crime) विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

 

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे गुन्हे वाढत असल्याने खडक पोलीस ठाण्यातील तपास पथकाला (Investigation Team) रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी दिले होते. त्यानुसार खडक पोलीस स्टेशन हद्दीतील रेकार्डवरील गुन्हेगार चेक करीत असतांना पोलीस अंमलदार रवी लोखंडे (Ravi Lokhande) व सागर घाडगे (Sagar Ghadge) यांना माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार जैद ऊर्फ लंगडा जमीर दलाल याने मक्का टॉवर सोसायटी (Mecca Tower Society) मधील एक्सलंट एन्टरप्रायझेस (Excellent Enterprises) या दुकानाचे बाहेर ठेवलेल्या अ‍ॅल्युमिनीयमच्या पट्ट्या व पुणे शहरातुन वेगवेगळ्या ठिकाणावरून अ‍ॅक्टीव्हा (Activa) गाड्यांची चोरी केली असुन तो स्वारगेट वेगा सेंटर समोरील बोळात थांबलेला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला पकडुन त्याचाकडुन स्वारगेट येथील धोबी घाट कॅनाल लगत लपवुन ठेवलेल्या लहान मोठ्या 22 अ‍ॅल्युमिनियमच्या पट्ट्या व 5 अ‍ॅक्टीव्हा मोपेड गाड्या जप्त केल्या. त्यातील एका गाडीचा वापर त्याने अ‍ॅल्युमिनियमच्या पट्ट्या चोरी करताना वापर केला होता. जप्त केलेल्या अ‍ॅक्टीव्हा खडक 2, हडपसर (Hadapsar Police Station) 1 आणि कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीतून 1 चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीकडून एकुण 2 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

आरोपी जैद ऊर्फ लंगडा जमीर दलाल हा सराईत गुन्हेगार असुन त्याचावर यापूर्वी खडक, भारती विद्यापीठ (Bharti Vidyapeeth Police Station), मार्केटयार्ड पोलीस ठाणे (Market Yard Police Station) खुनाचा प्रयत्न, खंडणी (Ransom) मागणे, दरोडाची पुर्व तयारी, जबरी चोरी इत्यादी प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 डॉ. प्रियंका नारनवरे (DCP Dr. Priyanka Naranvare),
सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग सतिश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Senior Inspector of Police Shrihari Bhairat),
पोलीस निरीक्षक गुन्हे हर्षवर्धन गाडे (Police Inspector Harshvardhan Gade),
पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे (PSI Rahul Khandale), पोलीस अंमलदार अजीज बंग, संदिप पाटील,
रवी लोखंडे, सागर घाडगे, राहुल मोरे, विशाल जाधव, हिंमत होळकर,
कल्याण बोराडे, नितीन जाधव, प्रवीण गव्हाणे, समीर शेख, किरण शितोळे, महेश पवार यांचे पथकाने केली आहे .

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Khadak police arrest criminalfor stealing two wheeler and aluminum straps Property worth Rs 2 lakh confiscated

 

हे देखील वाचा :

SBI Recurring Deposit | एसबीआयच्या कोट्यावधी खातेधारकांसाठी खुशखबर ! देशातील सर्वात मोठ्या बँकेने दिली ‘ही’ भेट

SaReGaMaPa Winner Vaishali Bhaisane Made | ‘माझ्या हत्येचा कट रचला जातोय’; राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या गायिकेच्या Facebook पोस्टने प्रचंड खळबळ

Stress Relief Tips | जर तुम्ही सुद्धा असाल Stress ने त्रस्त, तर ‘या’ 3 टिप्स करतील मन शांत

 

Related Posts