IMPIMP

Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींना लोणीकाळभोर पोलिसांकडून अटक

by nagesh
Pune Crime | three criminals arrested for armed attack on hotel workers in warje malwadi pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | खुनाचा प्रयत्न (Attempted Murder) करुन दोन वर्षे फरार असलेल्या दोन आरोपींना लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातील (Loni Kalbhor Police Station) तपास पथकाने (Investigation Team) सापळा रचून अटक (Arrest) केली. प्रशांत शिंदे (Prashant Shinde) आणि सागर गायकवाड (Sagar Gaikwad) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. आरोपी 2020 पासून फरार होते. पोलीस त्यांच्या मागावर होते अखेर आज (शुक्रवार) नायगाव येथील प्रयागधाम (Prayagdham Naigaon) गेटच्या समोरुन (Pune Crime) अटक करण्यात आली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

याबाबत संतोष कैलास पाडळे Santosh Kailash Padle (वय-23 रा. आदर्श कॉलनी, नायगाव, ता. हवेली) यांनी 31 मे 2020 रोजी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. घटनेच्या दिवशी रात्री साडे आठच्या सुमारास फिर्यादी यांना सात ते आठ जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करुन, हाताने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण (Beating) करुन चाकू मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी प्रशांत कुंडलिक शिंदे (वय-26) व सागर दत्तात्रय गायकवाड (वय-28 दोघे रा. नायगाव) फरार झाले होते.(Pune Crime)

 

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार शैलेश कुदळे (Shailesh Kudale) यांना माहिती मिळाली की, खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी नायगाव येथील प्रयागधाम गेटच्या समोर उभे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला. आरोपींना पोलीस आल्याचा सुगावा लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करुन त्यांना पकडले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे (Amit Gore) करीत आहेत.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai), वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi), पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (Police Inspector  Subhash Kale) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर (API Raju Mahanor)
पोलीस हवालदार नितीन गायकवाड, संतोष होले, पोलीस नाईक  श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, अमित साळुंखे,
पोलीस कॉन्स्टेबल राजेश दराडे, बाजीराव वीर,  दिगंबर साळुंखे, मल्हार ढमढेरे, विश्रांती फणसे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Lonikalbhor police Arrested Abscond Criminals Who Are In Attempt To Murder Case

 

हे देखील वाचा :

Eknath Khadse | राजकारणात इतिहासजमा झाले म्हणणाऱ्यांना एकनाथ खडसेंचे उत्तर; म्हणाले…

Tata Group च्या ‘या’ स्टॉकमध्ये मिळू शकतो 41% शानदार रिटर्न; दमदार बिझनेस आऊटलुकवर BUY रेटिंग; पहा टार्गेट

SBI Card Stock | एसबीआयचा ‘हा’ स्टॉक करू शकतो कमाल, 1260 रुपयांपर्यंत जाऊ शकतो शेअरचा भाव; एक्सपर्टने म्हटले खरेदी करा

 

Related Posts