IMPIMP

Pune Crime | 5 लाखाच्या कर्जावर 15 लाख घेऊन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सावकाराला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

by nagesh
Pune Crime News | Drugs worth 11 lakh seized in two operations in Pune; Catha Idulis Khat, drugs seized for the first time, two foreign nationals arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Police | 5 लाख रुपयांचे कर्ज घेऊन त्यावर 15 लाखांची परतफेड केल्यानंतरही आणखी 8 लाखांची मागणी करुन शिवीगाळ केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी सावकारी करणार्‍या सावकाराला (Moneylender) गुन्हे शाखेच्या युनिट 4 (Pune Police Crime Branch) च्या पथकाने अटक (Arrest) केली आहे.

 

दत्ता गोकुळ वाघमारे Datta Gokul Waghmare (वय 29, रा. विजय विहार अपार्टमेंट, प्रितनगर सोसायटी, चंदननगर) असे या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी येरवड्यातील (Yerwada) एका 38 वर्षाच्या व्यक्तीने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी 2018 मध्ये आरोपी दत्ता वाघमारे याच्याकडून 5 लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात त्यांनी आजपर्यंत त्यांना 15 लाखांपेक्षा अधिक पैसे दिले. तरी देखील आणखी 8 लाख रुपयांची वाघमारे फिर्यादीकडे वारंवार मागणी करीत तगादा लावला होता. पैसे दिले नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली. फिर्यादी यांच्या घरात जबरदस्तीने घुसून मुद्दल व व्याजाचे पैसे (Interest Money) देण्याचे कारणावरुन फिर्यादी व त्यांचे कुटुंबियांना शिवीगाळ केल्याने गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेकडे ही तक्रार मिळताच त्यांनी दत्ता वाघमारे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक पाटील (PSI Patil) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Money Lender Crime News

 

हे देखील वाचा :

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांनी गृहखात्याला झापलं? म्हणाले – ‘एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कळलं कसं नाही

Sharad Pawar And Eknath Shinde | शरद पवार यांच्या नंतरचे राज्यातील सर्वात मोठे बंड; पवार यशस्वी ठरले, एकनाथ शिंदे यशस्वी होतील का?

Aaditya Thackeray Twitter Bio | राजकीय भूकंप होणार ? आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन मंत्रीपदाचा उल्लेख हटवला; राजकीय चर्चांना उधाण

MNS On Thackeray Government | ‘गुवाहटीत असली, ‘वर्षा’वर नकली अन् सेक्युलर गॅसवर’; मनसेचा जोरदार हल्लाबोल

Maharashtra Political Crisis | उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार ?, शिवसेना नेते संजय राऊत यांचं खळबळजनक ट्विट; म्हणाले…

 

Related Posts