IMPIMP

Pune Crime | कोल्हापूरला जाण्यासाठी हात दाखविला ! बस न थांबविल्याने चालकाला मारहाण करणार्‍या तिघांना पुणे पोलिसांकडून अटक

by nagesh
Pune Crime | Sunny Hiwale accomplices charged in riot at Nobel Hospital three inmates arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कोल्हापूरला (Kolhapur) जाण्यासाठी बसला हात दाखविला असतानाही ती न थांबल्याने रिक्षातून पाठलाग करुन त्यांनी बस अडविली. बसचालकाला लाकडी दांडक्याने मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) तिघांना अटक केली (Pune Crime) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

संतोष वसंत साळुंखे (वय ४२, रा. मुंगसे बिल्डिंग, राजे चौक, भारती विद्यापीठ), अक्षय आनंदराव गायकवाड (वय २५, रा. संतोषनगर, कात्रज – Katraj) आणि अनिल बाळकृष्ण पवार (रा. सातारा – Sarata) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार कात्रज जुना घाटातील रामापॉइंटजवळ बुधवारी रात्री दहा वाजता घडला.

 

याप्रकरणी अजित तात्याबा कदम (वय ४९, रा. सटालेवाडी, सातारा) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कदम हे बस घेऊन सातार्‍याकडे जात होते. त्यावेळी अनिल पवार यांनी बसला हात दाखविला. मात्र, बस थांबली नाही.
त्याचा राग येऊन गायकवाड हे संतोष साळुंखे व अक्षय गायकवाड यांना घेऊन त्यांनी रिक्षाने बसचा पाठलाग केला.
कात्रज घाटातील रामा पॉइंट येथे बसच्या पुढे रिक्षा घालून तिला थांबण्यास भाग पाडले.
फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लाकडी दांडक्याने तसेच हाताने मारहाण (Pune Crime) करुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक देव (PSI Dev) तपास करीत आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Pune Crime | Showed hands to go to Kolhapur! Pune police arrested three persons for beating the driver for not stopping the bus FIR in Bharti Vidyapeeth Police Station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुणे पोलिसांकडून राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक ! टीईटी पेपर फुटीसाठी मदत केल्याचा ठपका

Pune Crime | पुण्यातील 21 वर्षीय तरूणीला लग्नाच्या आमिषाने भूगाव येथील लॉजवर नेलं, बलात्काराच्या काही दिवसांनंतर केला ‘गर्भपात’

LIC Alert | एलआयसीनं ग्राहकांना केलं सतर्क ! Logo पाहून ठेवू नका विश्वास, अन्यथा होईल मोठे नुकसान; जाणून घ्या

 

Related Posts