IMPIMP

Pune Crime | …म्हणून आपल्याच मामाच्या घरात घुसून टोळक्याकडून तोडफोड, वानवडी परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | incident of attack on a school boy by a goon in kothrud area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पूर्ववैमनस्यातून तरुण मामाच्या घरी आल्याचे पाहून टोळक्याने घरात शिरुन मारहाण केली घरातील TV फोडून नुकसान केले. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी चिक्या ऊर्फ ओंकार श्रावण बगाडे (वय १९, रा. रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२८/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अजय उकिर्डे, फिटर पेम्या ऊर्फ प्रेम थोरात, ईरफान शेख ऊर्फ टिल्ली, मंगेश जाधव, अथर्व शिंदे (सर्व रा. रामटेकडी, हडपसर Ramtekdi Hadapsar) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. फिर्यादी हे १२ जून रोजी सायंकाळी ७ वाजता मामाची विचारपूस करण्यासाठी त्याच्या घरी मित्रासोबत गेले होते. यावेळी आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादीच्या मामाच्या घरात शिरले. त्यांनी फिर्यादी यांना लाकडी बांबु व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घरातील टी व्ही फोडून २५ हजार रुपयांचे नुकसान केले. ते घराचे बाहेर जात असताना आरोपींनी पुन्हा त्यांच्यावर पालघन, लोखंडी रॉड व सिमेंट ब्लॉक, दगडाने मारहाण करुन परिसरात दहशत माजविली. संदीप लोहार यांच्या रिक्षाची काच फोडली. मनिषा साबळे यांच्या छातीवर दगड मारुन जखमी करुन ते निघून गेले. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक भोसले (PSI Bhosale) अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | so broke into your own uncles house and vandalized by gang incident in Wanwadi area

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांची नवी शक्कल ! मोबाईल पाठवून त्यातील अ‍ॅपमध्ये माहिती भरायला सांगून साडेसात लाखांची फसवणूक

Pune Crime | पुण्यात MBBS ला अ‍ॅडमिशन देण्याच्या आमिषाने वकिल महिलेकडून 8 लाखांची फसवणूक

Devendra Fadnavis | पंकजा मुंडे नाराज? देवेंद्र फडणवीस म्हणाले…. (व्हिडिओ)

Pune PMC News | क्षेत्रिय अधिकार्‍यांनी त्यांच्या हद्दीतील बेकायदा व्यवसायांवर लक्ष ठेवावे; अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांची सूचना

Eknath Khadse | ‘गाफील राहिल्याने राज्यसभेत पराभव, विधानपरिषदेला ताकही फुंकून पिण्याची गरज’ – एकनाथ खडसे

 

Related Posts