IMPIMP

Pune Crime | माथाडी कामगारांच्या नावाने खंडणी मागणार्‍या ‘स्वराज्य शिलेदार’ संघटनेच्या अध्यक्षाला अटक

by nagesh
Pune Crime News | Extortion demanded by the crime branch in the name of Mathadi

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | माथाडी कामगारांच्या (Workers) नावाने व्यावसायिकांना खंडणी (Extortion) मागणार्‍या स्वराज्य शिलेदार माथाडी संघटनेच्या (Swarajya Shiledar Mathadi Sanghatan) अध्यक्षाला पैसे घेताना पोलिसांनी सापळा रचून पकडले. ओंकार रमेश हिंगे Omkar Ramesh Hinge (वय २३, रा. शिवतेजनगर, बिबवेवाडी) असे अटक (Arrest) केलेल्याचे नाव आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी एका २८ वर्षाच्या व्यावसायिकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४२/२२) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी एका कंपनीत कामगार पुरविण्याचे कंत्राट घेतले आहे. ओंकार हिंगे याने फिर्यादी यांना फोन करुन तसेच भेटून बिबवेवाडी एरियामध्ये स्वराज्य शिलेदार माथाडी संघटना आहे. मी त्या संघटनेचा अध्यक्ष आहे. तु कंपनीकडून लेबर काँट्रॅक्ट (Labor contract) घेतले आहे.ते माहिती झाले आहे. तु तेथे लावलेले कामगार काढ व माझे माथाडी कामगार लाव. तु जर माथाडी कामगार (Mathadi Workers) लावले नाही तर महिन्याला ४० हजार रुपये द्यावे लागतील, असे बोलून खंडणी मागितली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी २ हजार रुपये व ३० हजार रुपयांच्या डमी नोटा असा बंडल तयार केला.
गंगाधाम ते अप्पर इंदिरानगरकडे जाणार्‍या रोडवरील कॅफे काई श्रीजी लॉन्ससमोर मंगळवारी दुपारी ३ वाजता त्याला बोलावण्यात आले.
तेथे फिर्यादीकडून रक्कम स्वीकारताना पोलिसांनी सापळा रचून पकडले. सहायक पोलीस निरीक्षक बरडे (Assistant Police Inspector Barde) तपास करीत आहेत. (Pune Crime)

 

Web Title :- Pune Crime | Swarajya Shiledar Association president arrested for demanding extortion in the name of Mathadi workers

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीचा अपहार; कंपनीच्या संचालकावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

EPFO Update | नोकरदार लोकांना मिळतील 81,000 रुपये, जाणून घ्या तारीख आणि चेक करण्याची पद्धत

Pune Crime | महिलेने 73 वर्षाच्या ज्येष्ठाकडे मागितली 20 लाखांची खंडणी; विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा

 

Related Posts