IMPIMP

Pune Crime | हॉटेलमध्येच पतीने केला पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार, मुंढवा परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | The husband committed unnatural torture on his wife in the hotel itself, incident in Mundhwa area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | दोघेही पती-पत्नी, पण त्यांचे पटत नसल्याने ते सध्या वेगळे रहात होते. आपआपासातील वाद मिटवून पुन्हा नव्याने संसार सुरु करण्यासाठी त्याने तिला हॉटेलमध्ये बोलावून घेतले. तेथे आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार पत्नीने केली आहे. त्यावरुन मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police) ३२ वर्षाच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या प्रकरणी मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राहणार्‍या एका ३० वर्षाच्या महिलेने मुंढवा पोलिसांकडे फिर्याद (गु. रजि. नं. ३१९/२२) दिली आहे. ही घटना हॉटेल वेस्टीनमध्ये २६ नोव्हेबर रोजी पहाटे साडेतीन ते साडेसात वाजेच्या दरम्यान घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती हा हरियाणा येथील पंचकुला येथे राहणारा आहे.
तर, पत्नी भोपाळमध्ये सध्या राहते. दोघांमध्ये कौटुंबिक वाद निर्माण झाल्याने ते वेगळे रहात आहेत.
पतीने आपसातील प्रांपचिक वाद मिटवून पुन्हा पती पत्नीप्रमाणे एकत्र राहण्याविषयी तो फिर्यादी यांच्याशी बोलला.
त्याप्रमाणे एकमेकांना संधी देण्याबाबत सविस्तर बोलण्यासाठी त्याने तिला हॉटेल वेस्टीनमध्ये बोलावले.
त्याने हॉटेलमध्ये रुम घेतली. तेथे पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याने जबरदस्तीने अनैसर्गिक
अत्याचार करुन असह्य वेदना दिल्या. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर मारुन टाकण्याची व आयुष्य बरबाद
करण्याची धमकी दिली. त्यानंतर या महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | The husband committed unnatural torture on his wife in the hotel itself, incident in Mundhwa area

 

हे देखील वाचा :

Pune ACB Trap | 2 लाखांच्या लाच प्रकरणी पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील क्षीरसागरसह दोघांना अटक, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Sushma Andhare | अरेच्च्या विसरलेच! सध्या तुमच्या मताला…, सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांना खोचक टोला

Pune PMC News | पर्वतीवरील जमिनीसाठी पुणे मनपाची सर्वोच्च न्यायालयात धाव

 

Related Posts