IMPIMP

Pune Hadapsar Police | अटकेतील आरोपीकडून घरफोडीचा गुन्हा उघड, हडपसर पोलिसांकडून 4 लाखांचा ऐवज जप्त

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Hadapsar Police | पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. त्याच्याकडून चार लाख 38 हजार रुपये किंमतीचे 78 ग्रॅम 270 मि.ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले आहेत. निहालसिंग मन्नुसिंग टाक उर्फ शिखलकर (वय-19 रा. गाडीतळ, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Crime News)

फिर्यादी हे 12 फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास ससाणेनगर येथील घराला कुलूप लावून मुळ गावी सांगली येथे गेले होते. त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास त्यांना शेजारच्यांनी घरात चोरी झाल्याची माहिती दिली. फिर्यादी यांनी घरी येऊन पाहणी करुन हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली होती.(Pune Hadapsar Police)

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला ताब्यात घेऊन
त्याच्याकडे चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळून घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरलेले 4 लाख 38 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रविण अब्दागिरे करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर. राजा,
सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे,
पोलीस निरीक्षक गुन्हे मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक गुन्हे उमेश गित्ते यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन
कुदळे, प्रविण अब्दागिरे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव,
प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, अजित मदने, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, सचिन गोरखे, अमित साखरे,
कुंडलीक केसकर, रामदास जाधव यांच्या पथकाने केली.

Pune Sinhagad Road Murder Case | पुणे : गैरसमजातून 9 वीत शिकणाऱ्या मुलाचा कोयत्याने खून

Related Posts