IMPIMP

Pune Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक-2024 : शहरातील 85 जणांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

by sachinsitapure

पुणे : Pune Lok Sabha Election 2024 | लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील 85 जणांना दिलेले पोलीस संरक्षण काढून घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी दिले आहेत. शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते यांना पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले होते.(Pune Lok Sabha Election 2024)

पुणे शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रतिष्ठित नागरिकांना पुणे पोलिसांकडून संरक्षण उपलब्ध करुन देण्यात येते. पोलीस संरक्षण मिळावे यासाठी पोलीस आयुक्तालयात अर्ज करावा लागतो. शहरातील 110 जणांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. पोलीस संरक्षण व्यवस्थेत 350 पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा वापर केला जात आहे.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस संरक्षण पुरवण्यात आलेल्या 110 पैकी 85 जणांचे
पोलीस संरक्षण काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या पोलिसांचा निवडणुकीच्या
बंदोबस्तासाठी वापर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवला जाणार आहे.
ज्या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता नाही, अशा 25 ठिकाणचा बंदोबस्त काढून घेतला आहे.
पुणे पोलिसांकडे 54 जणांनी पोलीस संरक्षण मिळावे यासाठी अर्ज केले होते. मात्र, त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत.
तसेच ज्यांच्याकडे शस्त्र परवाना असलेल्या पिस्तूल, रिव्हॉल्वर, बंदूक अशी शस्त्रे आहेत ती जमा करण्याची प्रक्रिया सुरु
केली आहे. याशिवाय शहराच्या विविध ठिकाणी नाकाबंदी करुन संशयित वाहनांची पोलिसांकडून तपासणी करण्यात
येत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

PMC Property Tax | पुणे महापालिका मिळकत कराचे बिल मिळत नसलेल्या अडीच लाख मिळकतधारकांना यंदा ‘स्पीड पोस्ट’ने बील पाठवणार

Related Posts