IMPIMP

Pune PMC Election 2022 | आरक्षणानंतर तब्बल 25 प्रभागांतील बदलांमुळे ‘कही खुशी कही गम…’

by nagesh
Pune PMC Election 2022 | After reservation changes in as many as 25 wards 'Kahi Khushi Kahi Gum...'

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune PMC Election 2022 | महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी काढण्यात आलेल्या ओबीसी आणि महिला आरक्षणामुळे ३१ मे रोजी ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Political Reservation In Maharashtra) काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये तब्बल २५ प्रभागांमध्ये बदल झाले आहेत. यामुळे अवघ्या दोन महिन्यांपुर्वी महापालिकेत जाण्याची स्वप्न पाहिलेल्या काहीसा धक्का बसला आहे. तर काही ठिकाणी आरक्षणामुळे (OBC Political Reservation) समोरा-समोर निवडणुक लढवावी लागणार होती त्या माननीयांना दिलासाही मिळाला आहे. (Pune PMC Election 2022)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शुक्रवारी सोडत झाल्यानंतर बदल झालेल्या प्रभागांची यादी पुढील प्रमाणे :

१) लोहगाव- विमाननगर प्रभागामध्ये यापुर्वी खुल्या गटासाठी एक जागा आरक्षित होती. परंतू नवीन सोडतीमध्ये ही खुली जागा महिलांसाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे पुरुषांमधील इच्छूकांला केवळ ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित जागेवर निवडणूक लढता येणार आहे.

२) पश्‍चिम खराडी- वडगाव शेरी या प्रभागामध्ये दोन जागा खुल्या गटासाठी होत्या. त्यापैकी एक जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहे.

३) वडगावशेरी- रामवाडी या प्रभागामध्ये देखिल दोन जागा खुल्या गटासाठी होत्या. त्यापैकी एक जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहे.

४) गोखलेनगर- वडारवाडी या प्रभागातील दोन जागा खुल्या गटासाठी होत्या. त्यापैकी एक जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहे.

५) फर्ग्युसन कॉलेज- एरंडवणे या प्रभागामध्ये पुर्वी दोन जागा खुल्या गटासाठी आरक्षित होत्या तर एक जागा खुल्या गटातील महिलांसाठी आरक्षित होती. याठिकाणी दोन जागा महिलांसाठी त्यापैकी एक ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाल्याने खुल्या गटातील इच्छुक पुरूषांना धक्का बसला आहे.

६) शनिवार वाडा- कसबा पेठ प्रभागातील दोन जागा खुल्या गटासाठी होत्या. परंतू नवीन रचनेत दोन जागा महिलांसाठी झाल्या असून त्यापैकी एक जागा ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाली आहे.

७) कोरेगाव पार्क- मुंढवा प्रभागामध्ये खुल्या प्रवर्गासाठीच्या जागेवर खुल्या गटातील महिला आरक्षण पडले आहे. तर ओबीसी प्रवर्गाची जागा खुली झाली आहे.

८) साडेसतरानळी- आकाशवाणी प्रभागामध्ये पुर्वी दोन जागा महिलांसाठी आरक्षित होत्या. तेथिल महिलांसाठीची एक जागा कमी झाली असून त्या जागेवर ओबीसी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. (Pune PMC Election 2022)

९) मगरपट्टा- साधना विद्यालय प्रभागामध्ये दोन जागा महिलांसाठी आरक्षित होत्या. नवीन रचनेत एकच जागा महिलांसाठी आरक्षित झाली असून उर्वरीत जागा ओबीसी प्रवर्ग आणि खुल्या गटासाठी राहील्या आहेत. त्यामुळे माजी नगरसेवक बंडू गायकवाड की आमदार चेतन तुपे यांचे चिरंजीव हा राष्ट्रवादीचा तिढा सुटला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

१०) महात्मा फुले स्मारक- भवानी पेठ प्रभागामध्ये एक जागा महिलांसाठी तर दोन जागा खुल्या गटासाठी राखीव होत्या. त्याठिकाणी खुल्या गटाची एक जागा कमी झाली असून ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाली आहे.

११) घोरपडे पेठ उद्यान- महात्मा फुले मंडई या प्रभागामधील दोन खुल्या प्रवर्गातील जागेपैकी एक जागा ओबीसी प्रवर्गातील खुल्या गटासाठी राखीव झाली आहे.

१२) जय भवानीनगर- केळेवाडी प्रभागातील दोन खुल्या प्रवर्गातील जागेंपैकी एका जागेवर ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे.

१३) कोथरूड गावठाण- शिवतिर्थनगर प्रभागामध्ये पुर्वी दोन जागा खुल्या गटासाठी राखीव होत्या. त्याठिकाणी आता दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. यापैकी एक जागा ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाली आहे. त्यामुळे एका खुल्या जागेवर अनेक दिग्गज एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे.

१४) भुसारी कॉलनी- बावधन खुर्द या प्रभागामध्ये पुर्वी दोन जागा महिलांसाठी राखीव होत्या
त्यापैकी एक जागा कमी झाली असून त्या जागेवर ओबीसी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे.

१५) आयडीयल कॉलनी- महात्मा सोसायटी प्रभागामध्ये दोन जागा खुल्या गटासाठी राखीव होत्या.
त्यापैकी एका जागेवर ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण पडले आहे.

१६) वारजे- कोंढवे धावडे या प्रभागामध्ये दोन जागा खुल्या गटासाठी होत्या.
त्यापैकी एक जागा कमी झाली असून त्या जागेवर ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण पडले आहे.

१७) रामनगर – उत्तमनगर शिवणे या प्रभागामध्ये दोन जागा महिलांसाठी राखीव होत्या.
त्यापैकी एक जागा कमी झाली असून त्या जागेवर ओबीसी प्रवर्गातील खुल्या गटासाठी आरक्षण पडले आहे.

१८) जनता वसाहत- दत्तवाडी या प्रभागामध्ये खुल्या गटासाठी एक, एस.सी. खुल्या गटासाठी एक आणि एक जागा महिलांसाठी राखीव होती.
आजच्या सोडतीमध्ये यापैकी खुल्या गटासाठीची जागा ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाली आहे.

१९) काळे बोराटे नगर- ससाणेनगर प्रभागामध्ये दोन जागा खुल्या गटासाठी होत्या.
त्यापैकी एक जागा कमी झाली असून त्या जागेवर ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण पडले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

२०) फुरसुंगी प्रभागामध्ये दोन जागा खुल्या गटासाठी होत्या.
त्यापैकी एक जागा कमी झाली असून त्या जागेवर ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण पडले आहे.

२१) अप्पर सुपर इंदिरानगर प्रभागातील एका एस.सी.जागेसह दोन जागा महिलांसाठी आरक्षित होत्या.
नवीन आरक्षणात त्यापैकी खुल्या गटातील महिलांची जागा कमी झाली असून त्या जागेवर ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण पडले आहे.
यामुळे नगरसेविका रुपाली धाडवे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

२२) बालाजीनगर- शंकर महाराज मठ प्रभागामध्ये पुर्वी दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या होत्या.
त्यापैकी एक जागा कमी झाली असून त्याठिकाणी ओबीसी प्रवर्गातील खुल्या गटाचे आरक्षण पडले आहे.

२३) चैतन्यनगर- भारती विद्यापीठ प्रभागामध्ये दोन जागा महिलांसाठी राखीव होत्या.
त्यापैकी एक जागा कमी झाली असून त्या जागेवर ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण पडले आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक विशाल तांबे आणि युवराज बेलदरे यांची अडचण दूर झाली आहे.

२४) सुखसागरनगर- राजीव गांधीनगर प्रभागामध्ये दोन जागा महिलांसाठी आरक्षित होत्या.
त्यापैकी एक जागा कमी झाली असून त्याठिकाणी ओबीसी प्रवर्गातील खुले आरक्षण पडले आहे.

 

२५) कात्रज- गोकुळनगर प्रभागामध्ये दोन जागा खुल्या गटासाठी आरक्षित होत्या.
त्यापैकी एक जागा कमी झाली असून ती जागा ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाली आहे.

 

Web Title :- Pune PMC Election 2022 | After reservation changes in as many as 25 wards ‘Kahi Khushi Kahi Gum…’

 

हे देखील वाचा :

MP Navneet Rana | खा. नवनीत राणा यांच्या जीवाला धोका?; ‘त्या’ पत्रामुळे खळबळ!

Ramdas Kadam | ‘हातपाय हलत नव्हते ही उद्धव ठाकरेंची नौटंकी, हॉस्पिटलमध्ये असताना..’ – शिवसेनेचे ज्येष्ठ बंडखोर नेते रामदास कदम

CM Eknath Shinde | सर्वांसाठी खुशखबर ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी ?

 

Related Posts