IMPIMP

Pune PMC News | अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांची बदली रद्द करण्यासाठी नागरिकांकडून आंदोलन आणि शासनाला पत्र (Video)

by sachinsitapure

पुणे :  Pune PMC News | लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) निमित्ताने महापालिका आयुक्त अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakane) यांची बदली करण्यात आली आहे. ढाकणे यांनी महापालिकेत Pune Municipal Corporation (PMC) पदभार हाती घेतल्यानंतर अतिक्रमणांमुळे कोंडलेल्या रस्त्यांसोबतच महत्वाच्या रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केल्याने नागरिकांमध्ये अल्पावधीतच त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्‍वास वाढला होता. अशातच निकषात बसत नसतानाही त्यांची बदली केल्याने सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त करत आंदोलनेही केली. महापालिकेमध्ये अनेक वर्षानंतर अधिकार्‍याची बदली थांबविण्यासाठी आंदोलने झाल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले.

भारतीय रेल्वे सेवेतील (Indian Railway Service) विश्‍वास ढाकणे यांची वर्षभरापुर्वी प्रतिनियुक्तीवर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. तत्पुर्वी त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) दीड वर्ष याच पदावर काम केले होते. पुणे महापालिकेत प्रशासक काळात त्यांनी मिसिंग रस्ते, अतिक्रमणांमुळे कोंडलेलले रस्ते, कात्रज कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण, गणेशखिंड रस्ता तसेच या रस्त्याला मिळणारे पर्यायी रस्ते, पुणे मुंबई रस्ता तसेच मुंढवा, केशवनगर परिसरातील बॉटलनेक ठरणार्‍या रस्त्यांसाठी रात्रंदीन मेहनत घेतली. शहरातील पंधरा आदर्श रस्त्यांसाठी विशेष योजना आखून त्यानुसार कामे सुरू केली. त्यांच्या कामाची दखल नागरीकांकडून घेतली गेली. यासोबतच न्यायालयाच्या निर्णयानंतर भिडे वाड्याची जागा ताब्यात घेणे, आदर्श शाळांची निर्मिती, महापलिकेच्या आयटीआयचा कायापालट आणि महापालिकेच्या रुग्णालयांतील बेडस्ची संख्या वाढविण्यासोबतच चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. यासाठी सीएसआर मधून निधीही मिळविला. झोकून देउन काम करण्याची पद्धत, नागरीकांचे शांतपणे ऐकून त्यावर कृतीतून समाधान करण्याची पद्धत यामुळे ते सर्वसामान्यांच्या कसोटीवर खरे उतरले.(Pune PMC News)

अशातच काल संध्याकाळी उशिरा निवडणुक आयोगाच्या निर्णयानुसार त्यांची बदली झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसोबतच विविध संघटना व लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. निवडणुक आयोगाच्या नियमांनुसार एकाच जिल्ह्यात तीन वर्षे कालावधी पुर्ण होण्यापुर्वीच ढाकणे यांची बदली करण्यात आल्याने संतप्त नागरिकांनी विमाननगर, तसेच महापालिका भवन समोर देखिल आंदोलन केले. माजी नगरसेवक उज्वल केसकर, प्रशांत बधे, सामाजिक कार्यकर्त्या श्‍वेता संग्राम होनराव- कामठे यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून ढाकणे यांच्या सारख्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याची बदली रद्द करावी, अशी मागणी केली आहे.

उपायुक्तांच्या बदल्यांमुळे ‘खाते प्रमुखांवर’ लोड

निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांचीही
बदली करण्यात आली असून येत्या एक दोन दिवसांत आणखी काही अधिकार्‍यांची बदली होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने दोन आठवड्यांपुर्वी मिळकत कर विभागाचे उपायुक्त अजित देशमुख आणि सामान्य प्रशासन
विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांची दोन आठवड्यांपुर्वी बदली केली, मात्र त्यापदांवर कोणाचीही नियुक्ती केलेली नाही.
अशातच निवडणूक आयोगाने झोनल आयुक्त प्रसाद काटकर यांचीही काल बदली केली, त्याजागी अद्याप कोणाला
नियुक्ती दिली नाही. शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या उपायुक्त आशा राउत, चेतना केरुरे, संतोष वारूळे या
अधिकार्‍यांचाही तीन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने त्यांचीही बदली होण्याची शक्यता आहे.
यामुळे अगदी आयुक्तांपासून उपायुक्तांपर्यंतच्या बदल्यांमुळे संपुर्ण प्रशासनाचा चेहेराच बदलला असून महापालिका
सेवेतील अधिकार्‍यांवरच वर्कलोड वाढणार असल्याचे दिसत आहे.

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : कंटेनरमधून अमेझॉन कंपनीच्या 48 लाखांच्या महागड्या वस्तू लंपास, चालकावर FIR

Related Posts