IMPIMP

Vasant More Resign MNS | फायरब्रॅंड नेते वसंत मोरे यांचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’ ! येत्या 2 दिवसांत पुढील भुमिका जाहीर करणार; राजीनामा देण्याचं कारणही सांगितलं (Videos)

by sachinsitapure

पुणे – Vasant More Resign MNS | मनसेचे फायरब्रॅंड नेते वसंत मोरे यांनी आज पक्षाचे सदस्यत्व आणि सर्व पदांचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मागील दोन वर्षापासून पक्षातून सातत्याने डावलले जात असतानाही मोरे पुणे मतदार संघातून लोकसभेची तयारी करत होते. परंतु पक्षाच्या शहरातील नेत्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी (Pune Lok Sabha)पक्षाची तितकीशी ताकद नसल्याने निवडणूक लढवू नये अहवाल पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे पाठविल्याने उद्विघ्न झालेल्या मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला.

वसंत मोरे यांनी पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र पाठवून राजीनामा देत असल्याचे कळविले. मागील काही काळापासून शहरातील नेत्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने डावलले जात आहे. पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देऊन भविष्यासाठी तयार करत असताना त्या कार्यकर्त्यांची देखील कोंडी केली जात आहे. पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून पक्षाच्या सदस्यत्वा सोबत सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे मोरे यांनी या पत्रात नमूद केले आहे.

पक्षाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहणारे वसंत मोरे पक्ष स्थापने पासून मनसे मध्ये आहेत. कात्रज परिसरातुन ते सलग तीन वेळा महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यांनी पालिकेत विरोधीपक्ष नेत्यासह गटनेते पद भूषविले आहे. तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्याकडे शहर अध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्याच्या विरोधात भुमिका घेतली होती. या भूमिकेला मोरे यांनी विरोध केल्याने त्यांची शहर अध्यक्ष पदावरून गच्छंती करण्यात आली. त्याचवेळी मोरे हे पक्ष सोडतील अशी चर्चा सुरू होती.

मात्र राज ठाकरे यांच्या भेटीनंतर समेट होऊन मोरे यांच्याकडे पक्षाचे सरचिटणीस पद आणि बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली. परंतु यानंतरही स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत तितकेसे सख्य राहिले नाही आणि दरी रुंदावतच गेली.

यानंतरही राज ठाकरे यांच्याप्रति आदरच असेल असे जाहीर करत मोरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली. मात्र नुकतेच पक्षाच्या आढावा बैठकीनन्तर पुणे लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवण्या इतपत पक्षाची ताकद नाही, त्यामुळे पक्षाने निवडणूक लढवू नये असा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आला. पक्षाने निवडणूक लढवू नये असे मत मांडण्याचा सूचना काही पदाधिकाऱ्यांनीच शाखाप्रमुखांना केल्याची माहिती मोरे यांच्या निकटवर्तीयांनी दिली. यामुळे उदविघ्न झालेल्या मोरे यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला.

पक्षस्थापने पासून मनसे मध्ये काम करण्याची संधी मिळाली. पक्ष वाढीसाठी महापालिका सभागृहात आणि बाहेरही कायम संघर्ष केला. परंतु पक्षांतुन काही मंडळींनी सातत्याने विरोधाची भुमिका ठेवली. याचा परिणाम ।माझ्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांना देखील भोगावा लागला. अशातच लोकसभेत विरोधी पक्षांशी संघर्ष करण्याची तयारी असताना येथील पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवायची भुमिका घेतली ही बाब त्रासदायक आहे. त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढील भुमिका येत्या एक दोन दिवसांत जाहीर करेन .

– वसंत मोरे

Pune Kondhwa Crime | लष्करात नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणारा कोंढवा पोलिसांकडून गजाआड

Related Posts