IMPIMP

Mahad News : MIDC तील बंद कंपनीच्या कॉलनीत आढळला मानवी सांगडा, परिसरात प्रचंड खळबळ

by sikandershaikh
Amravati News | shooting youth old argument gadgenegar police registered case against 5 persons

महाड : सरकारसत्ता ऑनलाइन  – महाड एमआयडीसीमधील (Mahad MIDC) इंटरनॅशनल होम टेक प्रा. लि. कंपनीच्या बंद असलेल्या कामगार वसाहतीमध्ये मानवी सांगाडा आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि. 16) ही घटना उघडकीस आली. आढळलेला सांगाडा साधारणत दोन ते अडीच वर्षांपूर्वीचा असावा असा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी सौरभ अरूणकुमार दास (वय-22 रा. पी.डी लाईट कॉलनी महाड,एमआयडीसी (Mahad MIDC)) यांनी महाड एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून सुट्टीनिमित्त आपल्या राहते घरी आले होते. त्यावेळी फेरफटका मारण्याकरिता गेल्या असता त्यांना मानवी सांगाडा आढळून आला. दास याच्यामुळे हा प्रकार उघडकीस आल्याने त्याच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

महाड एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाड एमआयडीसीमधील इंटरनॅशनल होम टेक प्रा. लि. (पूर्वीची त्रिंबक) या कंपनीच्या बंद असलेल्या कामगार कॉलनीत 16 फेब्रुवारी रोजी मानवी सांगाडा आढळून आला. महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.ओळख पटवण्यासाठी सांगाडा मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. डीएनए तपासणीकरिता मांडीचे हाड व दात तपासण्यासाठी पोलिसांनी मुंबई येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले आहेत. या प्रकरणाचा गुंता सोडविण्याचे आव्हान एमआयडीसी पोलिसांसमोर आहे.
अकस्मात मृत्यू म्हणून या घटनेची नोंद महाड- एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली आहे.
तपास पोलिस उपनिरीक्षक सागर पवार हे करीत आहेत.

Related Posts