IMPIMP

Coronavirus | घराच्या आत 6 फुटाचे अंतर ठेवून सुद्धा पसरू शकतो ‘कोरोना’, संशोधनात दावा

by nagesh
Coronavirus | corona can spread even after keeping a distance of 6 feet inside the house claims in the study

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोना व्हायरस (Coronavirus) बाबत दररोज नवनवीन रिसर्च समोर येत आहेत. या दरम्यान आता एक नवीन स्टडीत दावा करण्यात आला आहे की, घराच्या आत कोरोनापासून वाचण्यासाठी 6 फुटांचे अंतर सुद्धा पुरेसे नाही आणि 6 फुटाच्या अंतरात सुद्धा एक संक्रमित व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला संक्रमित (Coronavirus) करू शकते.

 

सस्टेनेबर सिटीज अँड सोसायटी नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित संशोधन सांगते की, केवळ शारीरीक अंतरच संसर्ग रोखण्यासाठी पुरेसे नाही. तर मास्किंग आणि व्हेंटिलेशनसारख्या गोष्टी सुद्धा यासाठी आवश्यक आहेत.

 

या संशोधनात तीन कारकांची चाचणी समोर आली आहे. यामध्ये स्पेसच्या माध्यमातून हवेच्या व्हेंटिलेशनची मात्रा आणि दर, यावर संशोधनात संशोधकांनी तीन कारकांची चाचणी केली. यापैकी स्पेसच्या माध्यमातून हवेची व्हेंटिलेशनची मात्रा आणि दर, विविध व्हेंटिलेशन रणनितीसंबंधी इनडोअर एयरफ्लो पॅटर्न, श्वास घेताना किंवा बोलतानाचे एरोसोल एमिसन मोड यांचा समावेश आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

विनामास्क 6 फुट अंतरावर सुद्धा संक्रमित होऊ शकते व्यक्ती
या संशोधनातून समजले की, जर एखादी संक्रमित व्यक्ती 6 फुटाच्या अंतरावर बसून विना मास्क एखाद्या दुसर्‍या व्यक्तीशी बोलत असेल
तर त्याचे व्हायरस दुसर्‍या व्यक्तीला संक्रमित करू शकतात.
हा प्रकार खोलीच्या आत जास्त दिसू शकतो, जिथे व्हेंटिलेशन कमी आहे.

 

संशोधकांना आढळले की, एयरोसोल्स डिस्प्लेसमेंट व्हेंटिलेशनच्या खोलीत आणखी जास्त वेगाने प्रवास करतात,
जिथे ताजी हवा सातत्याने जमीनीवरून वाहत असते आणि जुन्या हवेला छपराच्या जवळ एक बाहेर पडणार्‍या वेंटमध्ये ढकलते.
अशा प्रकारचे व्हेंटिलेशन बहुतांश घरात असते.

 

Web Title :- Coronavirus | corona can spread even after keeping a distance of 6 feet inside the house claims in the study

 

हे देखील वाचा :

Gold Price Update | सोने खरेदीदार खुश ! आता 27644 रुपयात मिळतेय 10 ग्रॅम सोने, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचे नवीन दर

Tirupati Devasthan Trust | ‘मातोश्री’वरून मुख्यमंत्री ठाकरेंचा CM जगनमोहन रेड्डींना ‘कॉल’; ‘तिरुपती ट्रस्ट’च्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती

Pune Fire News | पुण्यातील कंपनीत लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता; आग नियंत्रणात

 

Related Posts