IMPIMP

LIC Aadhaar Shila | महिलांसाठी ‘एलआयसी’नं आणली एक खास पॉलिसी; लाखोंचा होईल ‘लाभ’; जाणुन घ्या

by nagesh
LIC Jeevan Labh Scheme | insurance get rs 54 lakh in 25 years with death benefit in lic jeevan labh scheme

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (Life Insurance Corporation of India) माध्यमातुन वेगवेगळ्या पाॅलिसी उतरवल्या जातात. एलआयसी (LIC Aadhaar Shila) सातत्याने अनेक योजना समोर आणत असते. या पार्श्वभुमीवर आता विमा कंपनीने महिलांसाठी एक नवी योजना आणली आहे. महिलांच्या हितासाठी अशी लोकप्रिय योजना आणली आहे. ‘आधार शीला’ (LIC Aadhaar Shila) असं या पाॅलिसीचं नाव आहे. ज्या भारतीय नागरिक महिलेकडे आधार कार्ड (Aadhar Card) आहे त्या महिलेलाच आधार शीला या एलआयसी योजनेचा लाभ घेता येतो. तर योजना नेमकी काय आहे? हे सविस्तर जाणून घ्या.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

ही योजना (Aadhar Shila LIC Poilcy) 1 फेब्रुवारी 2020 रोजी तयार केली आहे.
या योजनेत लाईफ कव्हरसोबतच (Life Cover) तुमची बचत देखील होणार आहे.
या पॉलिसीमध्ये दैनंदिन 29 रुपयांची गुंतवणूक केली तर ती पुर्ण झाल्यावर त्या महिलेला 4 लाख रुपये मिळतील. या काळामध्येच ग्राहकाला कर्ज देखील मिळु शकते.
ही महिला 8 वर्षांपासून ते 55 वर्षांपर्यंत पॉलिसी खरेदी करू शकते.
कमीतकमी (Minimum ) 10 आणि अधिकाधिक (Maximum) 20 वर्षांपर्यंत या योजनेत गुंतवणूक केली जाऊ शकते.
त्याचबरोबर ही पॉलिसी जेव्हा मॅच्युअर होईल त्यावेळी त्या महिलेचे वयवर्ष 70 वर्षांहून अधिक असता कामा नये. असं सांगण्यात आलं आहे.

 

 

इतका प्रीमियम भरावा लागणार…

एखाद्या मुलीचे वय 20 आहे आणि तिने 20 वर्षांच्या काळासाठी आधार शीला ही पॉलिसी (Aadhar Shila LIC Poilcy) विकत घेतली.
आणि 3 लाख रुपयांचा विमा उतरवला तर तिला वर्षाला साधारण 10,868 रुपये प्रीमियम (Policy Premium) भरावा लागेल.
त्याच्या आगामी वर्षी हा प्रीमियम कमी होऊन, 10,649 रुपये इतका होणार आहे.
विमा पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर तिला 4 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ आणि विम्याची रक्कम आणि रॉयल्टी बोनस म्हणून 2 लाख रुपये मिळु शकतात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

प्रीमियम पेमेंट – (Premium payment)

आधार शीला (LIC Aadhaar Shila) या पॉलिसी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही मासिक, तिमाही, सहामाही अथवा वार्षिक प्रीमियम हप्ता भरू शकता.
जर तुम्ही प्रीमियम भरायला विसरलात तर तुम्हाला 1 महिन्याचा ग्रेस पीरियड (Grace Period) मिळेल.
पण जर तुम्ही प्रतिमहिना हप्ता भरायचं ठरवलं तर तुम्हाला 15 दिवसांचा ग्रेस पीरियड मिळणार आहे.

 

 

रोख लाभ

ही पॉलिसी (Aadhar Shila LIC Poilcy) चालु झाल्यावर 5 वर्षांत पॉलिसीधारकाचे निधन झालं तर त्याच्या वारसाला काही आश्वासित रक्कम मिळणार आहे.
मात्र, त्यानंतर विमा धारकाचा मृत्यू झाला तर वारसाला काही आश्वासित रक्कम (Sum Assured) आणि रॉयल्टी बोनस दोन्हीही मिळेल.
ग्राहकांनी जेवढ्या वर्षांसाठी पॉलिसी खरेदी केली आहे ती मुदत संपल्यानंतर तुम्ही सर्व रक्कम एकदम घेऊ शकता अथवा हप्त्या-हप्त्यांनीही घेऊ शकता.
समजा ग्राहकांनी सलग 2 वर्षं प्रीमियम भरू शकला नाही तर पॉलिसी कधीही स्वाधीन करता येऊ शकणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title : LIC Aadhaar Shila | lic special insurance scheme for women aadhaar shila on depositing 29 rupees daily

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 239 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Murder In Jalgaon | चॉपरने सपासप वार करुन मुलानं बापालं संपवलं

Sanjay Rathod | मंत्रीपदाचा राजीनामा का दिला?; संजय राठोड यांनी दिलं स्पष्टीकरण

 

Related Posts