IMPIMP

Pune Crime | FTII मध्ये शिकणाऱ्या 25 वर्षीय तरुणीची आत्महत्या, महिन्याभरातील दुसरी घटना

by nagesh
Pune Crime | young girl commits suicide in pune Film Television Institute of India ftii

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्यातील फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या Film Television Institute of India (एफटीआयआय-FTII) मध्ये शिकणाऱ्या 25 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची (Committed Suicide) धक्कादायक घटना घडली आहे. कामाक्षी बोहरा Kamakshi Bohra (वय – 25 रा. उत्तराखंड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. गुरुवारी (दि.1) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. महिन्याभरातील ही दुसरी घटना (Pune Crime) असून या घटनेमुळे एफटीआयआय मध्ये भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कामाक्षी आज लेक्चरला आली नसल्याने शिक्षकांनी काही विद्यार्थ्यांना ती राहत असलेल्या खोलीत जाऊन पाहण्यास सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. विद्यार्थ्यांना कामाक्षी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. वैफल्यग्रस्त असल्यामुळे आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी अश्विन अनुराग शुक्ला Ashwin Anurag Shukla (वय – 32 रा, गोवा – Goa) या विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
अश्विन शुक्ला हा सिनेमा ऑटोग्राफीच्या (Cinema Autography) शेवटच्या वर्षात शिकत होता.
आता ही दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे या शिक्षण संस्थेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

 

Web Title : –  Pune Crime | young girl commits suicide in pune Film Television Institute of India ftii

हे देखील वाचा :

RIL Share Price | रिलायन्सच्या शेअरमध्ये येणार मोठी उसळी ? एक्सपर्टने दिले 3000 च्या पुढील टार्गेट

CM Eknath Shinde | तुम्हाला माहितच आहे, सरकारच्या पाठिशी…, अमित शहांचे नाव घेत एकनाथ शिंदेंचे सूचक वक्तव्य

Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला, पण इच्छूकांना वाट पहावी लागणार ?

Ramdas Kadam | शिवसेना प्रमुखांचा मुलगा म्हणून किती दिवस ब्लॅकमेल करणार, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Related Posts