IMPIMP

Pune PMC News | शहरातील प्रमुख 15 रस्ते होणार ‘आदर्श रस्ते’ ! पहिल्या टप्यात 9 रस्त्यांसाठी मागविलेल्या 40 कोटी रुपयांच्या निविदांना लवकरच मान्यता

अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांची माहिती

by nagesh
Pune PMC News | 15 major roads in the city will be ‘ideal roads’! 40 crore tenders called for 9 roads in first phase to be approved soon

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC News | महापालिकेने शहरातील प्रमुख १५ रस्ते (Main Roads In Pune) आदर्श रस्ते म्हणून ‘मेन्टेन’ करण्यासाठी पावले उचलली आहेत. प्रामुख्याने या रस्त्यांवर किमान तीन वर्षे कुठल्याही पद्धतीने खोदाई होणार नाही, अतिक्रमण होणार नाही, दुभाजक आणि रोड फर्निचर आकर्षक आणि स्वच्छ ठेवण्यात येतील. यासोबतच अनधिकृत फलक, पोस्टर्स आणि ओव्हर हेड केबल मुक्त ठेवण्यात येणार आहेत. यापैकी ९ रस्त्यांच्या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या असून सुमारे ४० कोटी रुपये खर्च येणार आहे. लवकरच या निविदांना मान्यता देउन पुढील सहा महिन्यांत या रस्त्यांचे रुपडे पालटलेले असेल, असा विश्‍वास अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakne) यांनी व्यक्त केला. (Pune PMC News)

विकास ढाकणे यांनी सांगितले, की जी २० परिषदेच्या निमित्ताने शहरातील प्रमुख रस्त्यांवर रंगरंगोटी, दुरूस्ती आणि सुशोभीकरणाची कामे झाली आहेत. पहिल्या टप्प्यात यापैकी १५ प्रमुख रस्ते कायम स्वरूपीच सर्वतोपरी आदर्श व्हावेत, यासाठी ‘मिशन १५’ अंतर्गत नियोजन करण्यात आले आहे. यापैकी १५ रस्त्यांसाठी निविदा देखिल मागविण्यात आल्या आहेत. या रस्त्यावर ज्याठिकाणी छोट्या स्वरुपात पाणी, ड्रेनेज व सेवा वाहीन्यांची कामे करून घेणे, या रस्त्यांवरील व दुभाजकांवरील राडारोडा, कचरा उचलणे, आवश्यक तेथे पेटींग करून घेणे, दुभाजकांवर फ्लॉवर बेडस् निर्माण करणे, रस्त्याच्या कडेला पदपथ तसेच व्यावसायीक इमारतींच्या फ्रंट मार्जीन मधील अतिक्रमण काढून टाकणे, बेकायदा फ्लेक्स, फलक आणि ओव्हरहेड केबल्स काढून टाकणे, ही कामे करण्यात येणार आहेत. तसेच वाहतूक चिन्हे बसविणे, दुरूस्त करणे, दिशा दर्शक फलक बसविणे व दुरूस्त करणे ही कामे पुढील तीन वर्षे संबधित ठेकेदाराने करायची आहेत. (Pune PMC News)

सेवा वाहीन्यांसाठी प्रामुख्याने केबलसाठी रस्ते खोदाई करायला लागू नये यासाठी प्रमुख रस्त्यांवर काही अंतराने आडवे पाईपही टाकण्यात येणार आहेत. वाहतूक पोलिसांसोबतच चर्चा करून या रस्त्यांवरील पंक्चर्स कमी करून तसेच सिग्नल सिंक्रोनायजेशन करून वाहतूक सुरळीत राहील यासाठी देखिल विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ढाकणे यांनी नमूद केले.

हे १५ रस्ते होणार आदर्श

नगर रस्ता, सोलापूर रस्ता, मगरपट्टा रस्ता, पाषाण रस्ता, औंध रस्ता, बाणेर रस्ता,
संगमवाडी रस्ता, विमानतळ व्हीआयपी रस्ता, कर्वे रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता,
बिबवेवाडी रस्ता, कोरेगाव पार्क नॉर्थ मेन रस्ता, गणेशखिंड रस्ता ते सेनापती बापट रस्ता, शिवाजी रस्ता.

१५ आदर्श रस्त्यांवरील स्वच्छता, डागडुजी आणि वाहतूक कोंडी यासारख्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी ‘रोड मार्शल’ नेमण्यात येतील. यामध्ये महापालिकेचे कर्मचारी आणि वाहतूक पोलिस (Pune Traffic Police) देखिल असतील. जेणेकरून अगदी सफाई, किरकोळ डागडुजीचे कामे तातडीने करण्यास तसेच वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून रस्ते कोंडीमुक्त करण्यास जलद प्रतिसाद मिळेल.

– विकास ढाकणे, अतिरिक्त महापालिका आयुक्त.
(PMC Additional Municipal Commissioner Vikas Dhakane)

Web Title : Pune PMC News | 15 major roads in the city will be ‘ideal roads’! 40 crore tenders called for 9 roads in first phase to be approved soon

Related Posts