IMPIMP

Pune Rural Police | पौड पोलिसांकडून गावठी हातभट्टी दारूच्या अड्डयावर मोठी कारवाई, अड्डा उध्वस्त (Video)

by sachinsitapure

पुणे : पौड पोलिस ठाण्याच्या (Paud Police Station) हद्दीत करमोळी गावाजवळ मुळा नदी पात्रालगत काहीजण मोठया प्रमाणावर बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी दारू (Gavthi Hatbhatti Daru) तयार करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव (PI Manojkumar Yadhav) यांना यांना मिळाली होती. त्यानंतर पौड पोलिसांनी त्यावर मोठी कारवाई केली आहे.

पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी तात्काळ दोन पथके तयार करून करमोळी गावालगत असलेल्या गावठी हातभट्टी दारूच्या अड्डयावर कारवाई करण्यास सांगितले. पोलिस पथकाने सदरील ठिकाणी छापा टाकला आणि दारू अड्डा उध्वस्त केला. कारवाईमध्ये 4 लाख 20 हजार रूपये किंमतीची 16 हजार 850 लिटर (9 बॅरल भरलेले), 140 लिटर हातभट्टी तयार दारू तसेच दारू तयार करण्यासाठी लागणारी उपकरणे, जर्मन भांडी, इलेक्ट्रीक पाण्याची मोटर आणि दुचाकी असा एकुण 4 लाख 88 हजार रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुरूषोत्तम महिंद्रा बिरावत (रा. वारू, ता. मावळ), विर राम बिरावत (रा. करमोळी, ता. मुळशी) आणि नितीन देवेंद्र बिरावत (रा. करमोळी) यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव, सहाय्यक उपनिरीक्षक बाबा शिंदे, संतोष कुंभार, पोलिस हवालदार मनोज कदम, अनिता रवळेकर, पोलिस अंमलदार सचिन सलगर, अक्षय यादव, रेश्मा साठे यांच्या पथकाने केली आहे.

समाविष्ट गावातील मिळकत कर थकबाकी आणि शास्तीकर वसुलीला स्थगिती; लोकसभेच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यकर्ते झोपेतून जागे झाले?

Related Posts