IMPIMP

Relationship | पत्नीने पतीला दिली ‘छोटा पाहुणा’ येणार असल्याची खुशखबर, 2 वर्षापूर्वी नसबंदी केलेल्या पतीची उडाली झोप!

by nagesh
Relationship | viral wife surprise husband about pregnancy man shocked who had vasectomy 2 years ago

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन Relationship | सोशल मीडिया साईट रेडिटवर एका व्यक्तीने आपल्या द्विधा मनस्थितीचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. या व्यक्तीने सांगितले की, त्याला दोन मुले आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीने सरप्राईज देत सांगितले की ती प्रेग्नंट (Pregnant) आहे आणि दोघे पुन्हा आई-वडिल होणार आहेत. हे एकून त्या व्यक्तीला धक्का बसला कारण त्याने दोन वर्षापूर्वीच वस्कटोमी (Vasectomy) म्हणजे पुरुष नसबंदी करून (Relationship) घेतली होती.

 

व्यक्तीने रेडिटवर लोकांकडे आपली चिंता व्यक्त केली. त्याने लिहिले – मी दोन वर्षापूर्वीच नसबंदी केली होती. आता या गोष्टीची किती शक्यता आहे की
मुल माझे आहे किंवा माझ्या पत्नीचे एखादे अफेयर (Extra marital Affair) सुरू आहे.
इतके वर्ष पत्नीसोबत राहिल्यानंतर मला वाटत नाही की ती मला फसवू शकते.

 

पतीने लिहिले आहे की, त्याला हे पटत नाही की नसबंदीनंतर सुद्धा असे काय होऊ शकते की तो पिता होऊ शकतो.
या व्यक्तीने लोकांकडे मदत मागितली आणि म्हटले – मला इंटरनेटवर संमिश्र उत्तरे मिळत आहेत यासाठी मी तुमच्याकडे सल्ला मागत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अनेक लोकांनी पोस्टवर कमेंट करत वेगवेगळे सल्ले दिले आहेत.
काही लोकांनी म्हटले की, व्यक्तीने आपल्या पत्नीवर संशय घेऊ नये, त्याने अगोदर आपले स्पर्म काऊंट केले पाहिजे.
एका डॉक्टरने कमेंट करत लिहिले की त्याच्या एका रूग्णासोबत असे झाले होते ज्याची पत्नी, पतीने नसबंदी केल्यानंतर प्रेग्नंट झाली होती.

 

डॉक्टरने म्हटले की, या व्यक्तीचे स्पर्म काऊंट झीरो होते परंतु नसबंदीनंतर तिची ट्यूब वेगळ्या पद्धतीने जोडली गेली होती ज्यानंतर अचानक त्याचे स्पर्म काऊंट वाढले होते.
डॉक्टरशिवाय अनेक लोकांनी हाच सल्ला दिला.

 

तर दुसरीकडे अनेक लोकांनी व्यक्तीला नकारात्मक सल्ला दिला. एकाने म्हटले की, त्याने आपल्या अगोदरच्या दोन मुलांची सुद्धा डीएनए टेस्ट केली पाहिजे.
तर एकाने म्हटले की, त्याच्या पत्नीने अगोदर सुद्धा विश्वासघात केला असेल तर दुसर्‍यांदा करण्यास तिला काहीही वाटणार नाही.

 

Web Title : Relationship | viral wife surprise husband about pregnancy man shocked who had vasectomy 2 years ago

 

हे देखील वाचा :

Immunity | इम्यूनिटी वाढवणार्‍या जीवनशैलीसाठी आयुष मंत्रालयाने सुरू केले अभियान, 75 लाख लोकांना करणार ‘रोगप्रतिबंधक औषधां’चे वितरण

Karuna Munde | करुणा मुंडेंच्या गाडीत पिस्तुल ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं… (व्हिडिओ)

Gold Price Update | 9000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत स्वस्त झालं सोनं, इथं जाणून घ्या 14,18, 22, 23 आणि 24 कॅरेटचे नवीन दर

 

Related Posts