कराची : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान (Pakistan Former PM) इम्रान खान (Imran Khan) यांच्या गुजरानवाला या ठिकाणी रॅलीमध्ये गोळीबार (Firing) झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात इम्रान खान (Imran Khan) यांच्या पायाला जखम झाल्याची माहिती आहे. यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इम्रान खान यांच्यासोबत असलेल्या एका सहकाऱ्याचा यामध्ये मृत्यू (Death) झाला आहे तर तीन ते चारजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
A firing was reported near the container of former PM and Pakistan Tehreek-e-Insaf (PTI) chairman Imran Khan’s container near Zafar Ali Khan chowk in Wazirabad, Pakistan media reports. pic.twitter.com/mv5WvQIm7W
— ANI (@ANI) November 3, 2022
इम्रान खान यांच्यावर चार ते पाच जणांनी गोळीबार केल्याचे समोर आलं आहे. त्यापैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. इम्रान खान यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर केवळ पाकिस्तानच नाही तर जग हादरलं आहे. पाकिस्तान सध्या राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेतून जात असून या देशात सध्या अनागोंदीचे वातावरण आहे.
यापूर्वी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनाझिर भुत्तो (Benazir Bhutto) यांच्यावर देखील गोळीबार झाला होता.
त्यामध्ये भुत्तो यांचा मृत्यू झाला होता. यानंतर इम्रान खान यांच्यावर हल्ला होऊ शकतो अशी शक्यता आधीच
अनेकांनी वर्तवली होती. आता ती शक्यता सत्यात उतरली आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title :- Imran Khan | former pakistan pm imran khan injured in firing during rally
Sushma Andhare | शिंदे गटातील ‘हा’ आमदार आमच्या संपर्कात, सुषमा अंधारेंचा जळगावमध्ये मोठा दावा