IMPIMP

Android यूजर्सने व्हावे सावध, तुमच्या फोनची स्क्रीन रेकॉर्ड करत आहे हे अ‍ॅप

by nagesh
android users beware vultur malware is recording your phone screen

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Android | जर तुम्ही सुद्धा एक अँड्रॉईड यूजर (Android) आहात तर तुम्हाला सावध होण्याची आवश्यकता आहे. सिक्युरिटी एक्सपर्टनुसार एक धोकादायक मालवेयर (malicious malware) तुमच्या डिव्हाईसमध्ये घुसून पूर्ण डेटा चोरी करू शकतो. तज्ज्ञांनी या मालवेयरला Vultur नाव दिले आहे, जो तुमच्या डिव्हाईस स्क्रीनवर येणारी प्रत्येक माहिती रेकॉर्ड करतो. याचा अर्थ हा आहे की लॉगइन पासवर्ड (login passwords) पासून, इंटरनेट हिस्ट्री (internet history), बँक डिटेल्स (bank details) आणि वैयक्तिक टेक्स्ट मेसेज (personal text messages) आणि सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्हिटी (social media activity) पर्यंत सर्वकाही रेकॉर्ड (record) केले जाऊ शकते.

 

रिपोर्टनुसार, Vultur एक बँकिंग ट्रोजन (बँक डिटेल्स चोरी करणारा मालवेयर) आहे, जो इतर बँकिंग ट्रोजनपेक्षा खुप वेगळा आहे. अशाप्रकारचे दुसरे मालवेयर यूजर्सला बनावट वेबसाइटद्वारे अकाऊंट डिटेल्स भरून घेतात आणि नंतर चोरी करतात. तर, Vultur थेट यूजर्सच्या डिव्हाईसची स्क्रीन रेकॉर्ड करून अकाऊंटची माहिती चोरतो. याचा अर्थ आहे की, खर्‍या वेबसाइटवर लॉगइन करून सुद्धा तुम्हाला चूना लावला जाऊ शकतो.

संशोधकांनी मार्चच्या अखेरीस व्हल्चर मालवेयर शोधला, आणि म्हटले की यास प्रसिद्ध ब्रूनहिल्डा ड्रॉपर नेटवर्कच्या माध्यमातून सुद्धा वितरित करण्यात आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

या अ‍ॅपमधून पसरला मालवेयर

मोबाइल सिक्युरिटी वेबसाइट Threat Fabric च्या तज्ज्ञांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले की,
हा मालवेयर याच वर्षी मार्चमध्ये समोर आला आहे.
हा मालवेयर गुगल प्ले स्टोअरवरील एका अ‍ॅपद्वारे पसरवला गेला आहे,
जे हजारो वेळा डाऊनलोड केले गेले आहे.
ज्या अ‍ॅपवर प्रश्न उपस्थित केला जात आहे त्याचे नाव Protection Guard आहे.
मात्र, गुगल प्ले स्टोअरकडून सध्या हे अ‍ॅप हटवण्यात आले आहे.

 

 

Web Title :- android users beware vultur malware is recording your phone screen

 

 

हे देखील वाचा :

AK 47 | जम्मू काश्मीरमधील बडगाम येथील चकमकीत एक दहशतवादी ठार

NCB ची नवी मुंबईत मोठी कारवाई ! आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कराला अटक, तस्कराच्या हल्ल्यात एनसीबीचे 2 अधिकारी जखमी

Pune Corporation | ऍमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याच्या निविदांना मंजुरी देण्याचे अधिकार ‘स्थायी समितीकडे’; प्रस्ताव मान्यतेसाठी ‘स्टॅन्डींग’च्या समोर

 

Related Posts