IMPIMP

LPG Commercial Gas Cylinder Price | LPG सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ; 43 रुपयांनी महागला

by nagesh
LPG Commercial Gas Cylinder Price | commercial gas cylinder price hiked by rupees 43

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LPG Commercial Gas Cylinder Price | एलपीजी सिलेंडरच्या दरात आता पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. साधारण एलपीजी सिलेंडरच्या दरात 43 रुपयाची वाढ झाली आहे. ही किंमत वाढ व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये (LPG Commercial Gas Cylinder Price) झाली आहे. त्यामुळे दिल्लीतील 19 किलो व्यावसायिक सिंलेडर आता 1736.50 रुपये इतका झाला आहे. सध्या वाढलेले हे दर आजपासून अर्थात 1 ऑक्टेबंर पासून लागु होणार आहेत. विशेष म्हणजे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कुठलाही बदल झाला नाही. यावरुन सर्वसामान्यांना हा एक दिलासाच म्हणावा लागेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या असल्या तरी विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती 884.50 रुपयांवर स्थिर आहेत.
यामुळे महत्वाची बाब म्हणजे सर्वसामान्यांसाठी दिलासादायक गोष्ट आहे.
दरम्यान, व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर हा हॉटेल्स, ढाबे आणि सार्वजनिक भोजनालयांमध्ये अधिक प्रमाणात होताना दिसतो.
त्याचबरोबर आता व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्याने हॉटेलिंग महाग होऊ शकतं.

नुकतंच मागील महिन्यात अर्थात 1 सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या (LPG cylinder) दरात 75 रुपयांची वाढ केली गेली होती.
त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यात देखील ह्या दरात डबल वाढ झाली होती. दरम्यान, इंडेनच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 2021 साल वर्षात आजतागायत एकूण 404.50 रुपयांची वाढ दिसून आली आहे. तसेच, 31 डिसेंबर 2020 पर्यंत व्यावसायिक गॅस सिलेंडरचा भाव साधारण 1332 रुपये होता. तर, 1332 वरुन किरकोळ वाढ होत आता व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1736.50 रुपयांवर आहेे.

 

Web Title : LPG Commercial Gas Cylinder Price | commercial gas cylinder price hiked by rupees 43

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | दुसरा डोस घेतलेल्यामध्ये कोरोना होण्याचे प्रमाण जास्त, अजित पवारांनी सांगितले कारण

LIC Mobile Notification | एलआयसी पॉलिसीधारकांनी या पध्दतीनं अपडेट करावेत डिटेल्स, अन्यथा…

Ajit Pawar | मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

 

Related Posts