IMPIMP

Pune Big Basket Godown Fire | पुण्याच्या बावधनमधील ‘बिग बास्केट’च्या गोदामाला भीषण आग; 2 लाखाच्या नोटा जाळून खाक तर 8 लाख वाचवले

by nagesh
pune big basket godown fire | bavdhan godown fire big basket 2 lacs cash burn

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Big Basket Godown Fire | बावधन येथील बिग बास्केटच्या गोदामाला रविवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. या आगीत संपूर्ण पत्र्याचे हे गोदाम संपूर्णपणे नष्ट झाले आहे. आगीमध्ये धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाक झाले. पुणे महापालिका अग्निशमन दल, पिंपरी चिंचवड व पीएमआरडीए व एमआयडीसी येथील एकूण १२ फायरगाड्या व वॉटर टँकरच्या सहाय्याने ही आग विझविण्यात यश आले. (Pune Big Basket Godown Fire) आग लागताच गोदामातील सर्व जण बाहेर आल्याने कोणीही जखमी झाले नाही.

बावधन बुद्रुक येथे नागरिकांना घरपोच भाजीपाला, धान्य, किराणा पोहचविणार्‍या बिग बास्केट या कंपनीचे सुमारे २५ हजार स्क्वेअर फुटाचे गोदाम आहे.
हे गोदाम संपूर्णपणे पत्र्यांचे शेड असून त्याला सुमारे १२ ते १३ शटर होती. रविवारी रात्री साडेअकरा वाजता या गोदामाला आग लागली. गोदामाला
लागूनच मालाची वाहतूक करणारी वाहने व दुचाकी पार्क केल्या होत्या. त्यांनाही या आगीची झळ बसून ती वाहने पेटवून खाक झाली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अग्निशमन दलाला रात्री ११ वाजून ३४ मिनिटांनी या आगीची खबर मिळाली. आग इतकी भीषण होती की, त्यात पत्र्याच्या शेडला लावलेले लोखंडी अँगलही वाकले. त्यामुळे आत जाणे धोकादायक बनले होते. पत्रे अस्तावस्त पडल्याने आगीपर्यंत पाणी पोहचत नव्हते. तेव्हा २ जेसीबीच्या सहाय्याने पत्रे बाजूला करुन ही आग विझविण्यात आली.

८ लाख रुपये वाचविले
आग विझवित असतानाच तेथील व्यवस्थापकाने आत तिजोरी असून त्यात मोठ्या प्रमाणावर पैसे असल्याचे सांगितले. तेव्हा अग्निशमन दलाचे जवान, पोलीस कर्मचारी यांनी आत प्रवेश करुन ती तिजोरी बाहेर आणली. त्यातील ८ लाख रुपये वाचविण्यात यश आले. मात्र, तिजोरी जवळील टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले सुमारे २ लाख रुपये जळून खाक झाले. सुमारे ३ तास ही आग धगधगत होती.

 

Web Title : pune big basket godown fire | bavdhan godown fire big basket 2 lacs cash burn

 

हे देखील वाचा :

EPFO सबस्क्रायबर्ससाठी मोठा दिलासा ! UAN-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या

Pune Crime | गणेश मूर्ती विक्री दुकानातून महिलेने केले 50 हजार रुपये लंपास

Health Tips | धमण्यांमध्ये तयार होणारे प्लाक हृदय आणि मेंदूसाठी धोकादायक, ते टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 सोप्या टिप्स; जाणून घ्या

 

Related Posts