IMPIMP

IED Blast | छत्तीसगडमधील दंतेवाड्यात नक्षलवाद्यांचा सुरुंग स्फोटात १२ ग्रामस्थ जखमी

by nagesh
at least 12 persons were injured in an ied blast by maoists at ghotiya at around 7 30 am dantewada police reached

दंतेवाडा : वृत्तसंस्था-IED Blast | छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भुसुरुंगाचा स्फोट (IED Blast) होऊन त्यात बोलेरो वाहनामधील १२ जण जखमी झाले आहेत. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

गेल्या तीन वर्षात छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत २०४ लोकांचा मृत्यु झाला आहे. दंतेवाडा जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले की, जिल्ह्यातील मालेवाही पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घोटिया गावाजवळ नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. त्यात बोलेरो वाहनाचे नुकसान झाले आहे. या घटनेत १२ ग्रामस्थ जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना आज सकाळी साडे सात वाजण्याच्या दरम्यान घडली. नागरिक एका बोलेरो वाहनात बसून नारायणपूरहून दंतेवाडाकडे जात होते. घोटिया गावाजवळ बोलेरो पोहचल्यावर नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. त्यात वाहनाचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचून त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

 

Web Title : at least 12 persons were injured in an ied blast by maoists at ghotiya at around 7 30 am dantewada police reached

 

हे देखील वाचा :

Surendra Kumar Hockey | ‘शेजारच्यां’नी खरेदी करुन दिली होती पहिली ‘हॉकी स्टिक’; सुरेंदरच्या आईने केला खुलासा म्हणाली, ‘मुलाने कर्ज फेडले’

Pune Corporation | भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात ‘गोलमाल’; खोटे बिल काढल्याप्रकरणी उपअभियंता टुले निलंबित तर कनिष्ठ अभियंत्याची खातेनिहाय चौकशी

Amruta Fadnavis | पुण्यातील निर्बंधाबाबत अमृता फडणवीस ‘संतापल्या’; म्हणाल्या…

 

Related Posts