IMPIMP

Gold Price Today | सोन्यात घसरणीचा कल सुरूच, चांदीही झाली 515 रुपये स्वस्त, जाणून घ्या आजचे नवीन दर

by nagesh
gold-price-today-gold-price-today-gold-dropped-marginally-and-silver-fell-by-rupees-515-update-new-rates

नवी दिल्ली : वृत्त संस्थाGold Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात (Gold Price Today) सतत सुरू असलेला घसरणीचा कल कायम राहिला. आज 1 सप्टेंबर 2021 ला दिल्ली सराफा बाजारात घसरण नोंदली गेली. तर, चांदीच्या किमतीत सुद्धा घट झाली. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,129 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 62,336 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. अंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याचा दर घसरला, तर चांदीत मोठा बदल झाला नाही.

 

 

सोन्याचा नवीन दर (Gold Price Today)

दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात अवघ्या 6 रुपये प्रति 10 ग्रॅमची घट नोंदली गेली. दिल्ली 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर 46,123
रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचून बंद झाला. अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,811 डॉलर प्रति औंसवर पोहचला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

चांदीचा नवीन दर (Silver Price Today)

चांदीच्या किमतीत सुद्धा आज घसरणीचा कल होता. दिल्ली सराफा बाजारात बुधवारी चांदीचा दर 515 रुपयांच्या घसरणीसह 61,821 रुपये प्रति
किग्रॅवर बंद झाला. तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात कोणताही विशेष बदल झाला नाही आणि तो 23.82 डॉलर प्रति औंसवर पोहचला.

 

 

सोन्यात का झाली घसरण

एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) चे सिनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की, अंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमतीत लागोपाठ उलथा-पालथ सुरू आहे.
आज कॉमेक्सवर सोन्याचा हाजीर दर कमी झाला. तर, भारतीय शेयर बाजारात तेजीचा कल आहे.
यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव आहे.

 

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 292 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | बँक खात्यावर चुकून गेले अडीच लाख, पैसे मागायला गेल्यावर घडले असे काही

Mumbai Rape Case | बहिणीनं भावावर केला बलात्काराचा आरोप, न्यायालयासमोर आलं भयानक सत्य

 

Related Posts