IMPIMP

LIC Pension Policy | LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये एकदाच करा गुंतवणूक, आयुष्यभर मिळेल पेन्शन; येथे जाणून घ्या खरेदी करण्याची पद्धत

by nagesh
LIC Jeevan Pragati Plan | jeevan pragati plan of lic will give the benefit of 28 lakhs on your savings of rs 200

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाLIC Pension Policy | भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) सरल पेन्शन योजना (Saral Pension Scheme) सुरू केली आहे. ही एक नॉन-लिंक्ड सिंगल प्रीमियम स्कीम आहे. या योजनेअंतर्गत, पॉलिसीधारकाला फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागतो. यानंतर पॉलिसीधारकाला आयुष्यभर पेन्शन मिळते. (LIC Pension Policy)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

विमा नियामक IRDAI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही तत्काळ वार्षिक योजना आहे. एलआयसीने या पॉलिसीबद्दल सांगितले की, या प्लॅनमध्ये सर्व जीवन विमा कंपन्यांसाठी समान अटी आणि नियम आहेत. एलआयसीच्या या योजनेअंतर्गत, पॉलिसीधारक दोन उपलब्ध अ‍ॅन्युइटी पर्यायांपैकी कोणताही एक निवडू शकतो. या योजनेत पॉलिसी सुरू झाल्यापासून 6 महिन्यांनंतरही कर्ज घेता येते.

 

सरल पेन्शन योजनेचा पहिला पर्याय
एलआयसी सरल पेन्शन योजना निवडण्यासाठी दोन पर्याय आहेत. प्रथम, लाइफ अ‍ॅन्युइटीसह 100% खरेदी मुल्याचे रिटर्न. हे पेन्शन एकल जीवनासाठी आहे, म्हणजे पेन्शन पती-पत्नीपैकी एकाशी संबंधीत राहील, जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहे तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहील. त्याच्या मृत्यूनंतर पॉलिसी घेण्यासाठी भरलेला मूळ प्रीमियम त्याच्या नॉमिनीला परत केला जाईल. (LIC Pension Policy)

 

सरल पेन्शन योजनेचा दुसरा पर्याय
दुसरा पर्याय जॉईंट लाईफसाठी आहे. यामध्ये पती-पत्नी दोघांनाही पेन्शनने जोडले जाते. यामध्ये जो जोडीदार शेवटपर्यंत जिवंत राहतो, त्याला पेन्शन मिळत राहते. एखाद्या व्यक्तीला जिवंत असताना जेवढी पेन्शन मिळते, तेवढीच रक्कम त्यांच्यापैकी एकाच्या मृत्यूनंतरही दुसर्‍या जोडीदाराला आयुष्यभर मिळत राहते. जेव्हा दुसरा निवृत्तीवेतनधारक देखील जग सोडून जातो तेव्हा नॉमिनीला पॉलिसी घेताना दिलेले मूळ मूल्य दिले जाते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही तत्काळ वार्षिकी योजना
एलआयसीची ही योजना तात्काळ वार्षिकी योजना आहे. म्हणजेच पॉलिसी घेताच पेन्शन सुरू होईल. पेन्शनधारकाला दरमहा, त्रैमासिक, सहामाही किंवा वर्षातून एकदा पेन्शन घेण्याचा पर्याय आहे. कोणताही पर्याय निवडला तरी पेन्शन त्याच पद्धतीने सुरू होईल.

 

पॉलिसी कशी खरेदी करावी
हा प्लॅन ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे खरेदी करू शकता.

www.licindia.in या वेबसाइटवरून ऑनलाइन खरेदी करता येईल.

योजनेतील किमान वार्षिकी रु. 12,000 प्रतिवर्ष आहे.

किमान खरेदी किंमत वार्षिक मोडवर उपलब्ध आहे.

निवडलेले पर्याय आणि पॉलिसी घेणार्‍याचे वय यावर अवलंबून आहे.

या प्लॅनमध्ये कोणतीही कमाल खरेदी मूल्य मर्यादा नाही.

40 ते 80 वर्षे वयोगटातील लोक ही योजना खरेदी करू शकतात.

मासिक पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल, तर एका महिन्यात किमान एक हजार रुपये गुंतवावे लागतील.

त्याचप्रमाणे तिमाही पेन्शनसाठी एका महिन्यात किमान 3 हजार रुपये गुंतवावे लागणार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- LIC Pension Policy | lic pension policy one time investment in this lic policy for life long pension

 

हे देखील वाचा :

Shivsena MP Sanjay Raut | ‘इतिहास बदलण्याची ताकद एकनाथ शिंदे गटात नाही’ – संजय राऊत

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या बेसिक सॅलरीत होईल किमान 96000 रुपयांची वाढ, 1 सप्टेंबरपासून होऊ शकते लागू

Vijay Shivtare | शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी

 

Related Posts