IMPIMP

Modi Government | कोरोना मृतांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये भरपाई मिळणार; केंद्राची SC ला माहिती

by nagesh
Covid-19 Death | center not responsible for corona vaccine deaths governments affidavit in supreme court

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Modi Government | प्रत्येक कोरोना मृतांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची भरपाई दिली जाईल. राज्य आपत्ती निवारण निधीतून नुकसान भरपाईची ही रक्कम पीडितांच्या कुटुंबियांना देईल. याबाबत माहिती केंद्र सरकारने आज (बुधवारी) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दिली आहे. तसेच आगोदर झालेल्या कोरोना मृत्यूंसाठीच नव्हे तर भविष्यातील लोकांसाठीही भरपाई दिली जाईल, असं केंद्राने (Modi Government) सांगितलं आहे. ही रक्कम राज्य सरकार अर्थात राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाईल. कोर्टाच्या निर्देशांचे पालन केल्यानंतर याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

भारतात आतापर्यंत 3.98 लाख लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आली होती.
नियमानुसार, नैसर्गिक आपत्तीमुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची भरपाई मिळते.
पण कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या वाढल्यानंतर केंद्र सरकारने (Modi Government) नुकसानभरपाई देण्यास नकार दिला होता.

दरम्यान, भूकंप, पूर यासारख्या 12 प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आपत्ती कायद्याच्या कक्षेत येतात.
या आपत्तींमध्ये एखाद्याचा मृत्यू झाल्यास राज्य आपत्ती निवारण निधीतून चार लाख रुपयांच्या भरपाईचे आश्वासन दिले जाते, पण, कोरोना महामारी त्यापेक्षा वेगळी आहे.
त्यानंतर सुप्रीम कोर्टानेही केंद्र सरकारचा हा युक्तिवाद मान्य केला होता.
कोरोना मृतांच्या नातेवाईकांना किती रक्कम द्यायची हे सरकारने स्वतः ठरवावे, पण नुकसानभरपाई दिली पाहिजे असं सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) नमुद केलं होतं.

 

 

Web Title :- Modi Government | 50000 compensation covid deaths centre tells supreme court

 

हे देखील वाचा :

Pune Anti Corruption | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकार्‍यासह एका संस्थेचा सचिव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

Municipal Elections | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मुंबई वगळता पुणे-पिंपरीसह सर्वच महापालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग पध्दतीने निवडणूक

Corporator Archana Patil | आईवडील गमवलेल्या बालकांचे होणार सर्वेक्षण ! नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या मागणीला मुख्य सभेची मान्यता

 

Related Posts