IMPIMP

Supreme Court On Employee Transfer | बदलीचे ठिकाण कर्मचारी ठरवू शकत नाही, कंपनी मालकांना त्याचा अधिकार – सुप्रीम कोर्ट

by nagesh
Supreme Court | army not being fair to women officers says supreme court in hearing on women officers pil regarding promotion

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Supreme Court On Employee Transfer | सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, कुणीही कर्मचारी विशिष्ट ठिकाणी बदली करण्यासाठी दबाव आणू शकत नाही. मालकाला आपल्या आवश्यकतेनुसार बदली करण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद हायकोर्टच्या ऑक्टोबर 2017 च्या एका आदेशाला आव्हान देणार्‍या एका महिला प्राध्यापकाची याचिका फेटाळताना असे म्हटले आहे. अमरोहाहून गौतमबुद्ध नगरला बदली केल्याने संबंधित प्राधिकरणाद्वारे त्यांची विनंती फेटाळल्याच्या विरोधात केलेला अर्ज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court On Employee Transfer) रद्द केला.

 

जस्टिस एम. आर. शाह आणि अनिरुद्ध बोस यांच्या पीठाने आपल्या आदेशात म्हटले की, कर्मचारी एखाद्या ठिकाणी बदली करण्यासाठी किंवा न
करण्यासाठी दबाव आणू शकत नाही. हे मालकावर अवंलबून आहे की आपल्या गरजेनुसार एखाद्या कर्मचार्‍याचे स्थानांतर करावे किंवा नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अमरोहा जिल्ह्यात कार्यरत महिला प्राध्यापकाने हायकोर्टात दाखल आपल्या याचिकेत म्हटले होते की, त्यांनी गौतमबुद्ध नगरच्या एका कॉलेजमध्ये बदली करण्याची विनंती केली, जी प्राधिकरणाने सप्टेंबर 2017 मध्ये फेटाळली होती. महिलेच्या वकीलाने 2017 मध्ये हायकोर्टात बाजू मांडली होती की, महिला मागील चार वर्षापासून अमरोहामध्ये काम करत आहे आणि सरकारच्या धोरणानुसार तिला बदलीचा अधिकार आहे.

 

हायकोर्टाने म्हटले होते की, संबंधित प्राधिकरणाद्वारे आदेशावरून समजते की, प्राध्यापिका गौतमबुद्ध नगरच्या
एका कॉलेजमध्ये डिसेंबर 2000 मध्ये आपल्या सुरुवातीच्या नियुक्तीपासून ऑगस्ट 2013 पर्यंत 13 वर्ष सेवेत होती. यासाठी पुन्हा त्याच कॉलेजमध्ये पाठवण्याची त्यांची विनंती योग्य नाही.

 

Web Title : Supreme Court On Employee Transfer | supreme court said the employee cannot decide the place of transfer

 

 

हे देखील वाचा :

CBDT Tax Refund | सीबीडीटीने 70 हजार कोटी रुपयांचा टॅक्स रिफंड केला जारी

Pune Big Basket Godown Fire | पुण्याच्या बावधनमधील ‘बिग बास्केट’च्या गोदामाला भीषण आग; 2 लाखाच्या नोटा जाळून खाक तर 8 लाख वाचवले

EPFO सबस्क्रायबर्ससाठी मोठा दिलासा ! UAN-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या

 

Related Posts