IMPIMP

ACB Trap News | 60 हजार रुपये लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कर्यालयातील दोन भूमापक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

by sachinsitapure
Bribe Case

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाईन – प्लॉटची सरकारी मोजणी करण्यासाठी 60 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) औरंगाबाद भूमी अभिलेख कार्यालयातील (Aurangabad Land Records Office) दोन भूमापक (Surveyor) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) रंगेहाथ पकडले. सचिन बाबुराव विठोरे Sachin Baburao Vithore (वय- 35), किरण काळुबा नागरे Kiran Kaluba Nagre (वय-43) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोन भूमापकांची नावे आहेत. औरंगाबाद एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई मंगळवारी (दि.29) केली.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत 34 वर्षाच्या व्यक्तीने औरंगाबाद एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार दिली आहे. तक्रारदार यांनी पिसादेवी रोड येथील प्लॉटचे सरकारी मोजणीसाठी अर्ज दिला आहे. दिलेल्या अर्जावर मोजणी केल्यानंतर केलेल्या मोजणीचा नकाशा तक्रारदार यांना देण्यासाठी नमूद दोन्ही भूमापक यांनी तक्रारदार यांच्याकडे 1 लाख 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी दोघांनी परस्पर 50 हजार रुपये तक्रारदार यांच्याकडून घेतले. उर्वरित 60 हजार रुपयांची मागणी दोघांनी केली.

तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी औरंगाबाद एसीबीकडे (Aurangabad ACB Trap News) तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता भूमापक सचिन विठोरे व किरण नागरे यांनी प्लॉटची सरकारी मोजी केल्यानंतर
नकाशा देण्यासाठी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने मंगळवारी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 60 हजार रुपये लाच घेताना किरण नागरे व सचिन विठोरे यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर सिडको पोलीस ठाण्यात (CIDCO Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे
(Addl SP Vishal Khambe), पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर (DySP Rajeev Talekar) यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हनुमंत वारे (PI Hanumant Vare), पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर
(PI Nandkishore Kshirsagar)पोलीस अंमलदार तोडकर, नागरगोजे, पाठक, आघाव यांच्या पथकाने केली.

Related Posts