IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Thane | पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा कार्यालयीन सहाय्यक 25 हजार लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

पालघर : सरकारसत्ता ऑनलाइनजात प्रमाणपत्र पडताळणी (Caste Certificate Verification) करुन वैधता प्रमाणपत्र (Validity Certificate) देण्यासाठी पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र समितीचा (Palghar District Caste Certificate Committee) कार्यालयीन सहाय्यकाला Office Assistant (कंत्राटी) 25 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Thane) रंगेहात पकडले. सचिन अरुण हिरे Sachin Arun hire (वय – 32) असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या कार्यालयीन सहाय्यकाचे नाव आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Thane) ही कारवाई सापळा रचून केली असून या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत 37 वर्षाच्या व्यक्तीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Thane) तक्रार दिली आहे. सचिन हिरे हा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती पालघर येथे कार्यालयीन सहाय्यक (कंत्राटी) म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांच्या मित्राचे जात प्रमाणपत्र पडताळणी करुन वैधता प्रमाणपत्र विरिष्ठांकडून मिळवून देण्यासाठी सचिन हिरे याने 30 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीमध्ये 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते.

 

 

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
ठाणे एसीबीने (ACB Thane) 28 मार्च 2022 रोजी पडताळणी केली असता सचिन हिरे याने जात प्रमाणपत्राची पडताळणी करुन वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी 30 हजार रुपये लाच मागून तडजोडीत 25 हजार लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
ठाणे एसीबीच्या पथकाने हिरे याला ताब्यात घेतले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले (SP Punjabrao Ugale),
अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Additional Superintendent of Police Anil Gherdikar),
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप (Deputy Superintendent of Police Navnath Jagtap)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास (Police Inspector Swapan Biswas),
पोलीस हवालदार अमित चव्हाण, विलास भोये, पोलीस नाईक दिपक सुमडा, महिला पोलीस नाईक स्वाती तारवी यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Thane | Office Assistant of Palghar District Caste Certificate Verification Committee caught taking Rs 25,000 in anti corruption trap

 

हे देखील वाचा :

Coriander Leaves Benefits | वाढत्या वयाला वेसन घालू शकतो कोथिंबीरचा फेस पॅक आणि स्क्रब, जाणून घ्या कसा करायचा आहे वापर

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील सोमवार पेठ, मंगळवार पेठ, कोरेगाव पार्कसह ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Vitamin D Deficiency And Symptoms | शरीरात कमी झाले ‘हे’ व्हिटॅमिन तर गळतात केस, हाडे होतात कमकुवत; तात्काळ खायला सुरूवात करा ‘या’ गोष्टी

 

Related Posts