IMPIMP

NCB officer Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्या पहिल्या विवाहाचा फोटो ‘व्हायरल’

by nagesh
NCB officer Sameer Wankhede | ncb zonal director sameer wankhede old photo viral claim first marriage photo goes viral

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  NCB officer Sameer Wankhede | मुंबईच्या समुद्रात क्रूझवर अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने मोठी छापेमारी करत ड्रग्ज पार्टीचा (Mumbai Cruise Drugs Case) पर्दाफाश केला. त्यावेळी आर्यन खानसह (Aryan Khan) अनेक जणांना अटक केलीय. मात्र, त्यानंतर अनेक वेगवेगळे ट्विस्ट आता समोर येतान दिसतात. त्यातच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (NCB officer Sameer Wankhede) यांच्यावर सतत आरोप करत आहेत. तसेच त्यांनी काही फोटोही (Photo) समोर आणले आहेत. यामुळे राज्यात राजकीय वातावरणात अनेक वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर वारंवार आरोप करताना दिसतात. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच नवाब मलिक यांनी ट्विटरवर एक क्रॉप केलेला फोटो शेअर केला आहे. याला पहचान कौन असा कॅप्शनही दिला आहे. हा फोटो एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (NCB officer Sameer Wankhede) यांचा असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर त्यांच्या पहिल्या लग्नातील हा फोटो असल्याचं देखील सांगितलं जात आहे. पंरतु अजुनही याबाबत काही स्पष्ट माहिती समोर आली नाही. मात्र, नवाब मलिक यांनी क्रॉप करून शेअर केलेल्या फोटोचा पूर्ण फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

दरम्यान, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे पहिले लग्न डॉक्टर शबाना कुरेशी हिच्याशी झाल्याचा दावा केला जातोय.
तसेच 2006 साली समीर वानखेडे यांचा विवाह शबाना यांच्याशी झाल्याचं म्हटलं जातं आहे.
तेव्हाचा पूर्ण फोटो समाज माध्यमांवर प्रसिद्ध होत असून त्यातीलच समीर वानखेडे यांचा फोटो क्रॉप करून नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातुन शेअर केला आहे.

 

Web Title: NCB officer Sameer Wankhede | ncb zonal director sameer wankhede old photo viral claim first marriage photo goes viral

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | 7 दिवसानंतर 31% DA सह वेतन देणार मोदी सरकार; वाढतील 20484 रुपये, जाणून घ्या गणित

Pune Crime | पुण्यातील विमाननगर येथील कंपनीतील 27 वर्षीय सहकारी तरुणीवर लैंगिक अत्याचार; तरूण आला ‘गोत्यात’

Gas Cylinder | एलपीजी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची दुर्घटना झाल्यास मिळेल 50 लाखाचा फायदा ! तात्काळ जाणून घ्या प्रक्रिया

Social Media | सोशल मीडियावर शेयर केले पतीसोबत झालेले चॅट, न्यायालयाने पत्नीला सुनावली शिक्षा

 

Related Posts