IMPIMP

Pune Crime | पुण्यातील पोलीस ठाण्यात फिनाईल पिऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime | Raj Ravindra Pawar, a notorious criminal from Loni Kalbhor area of Pune, was deported for two years

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  पुण्यातील (Pune Crime) कोंढवा पोलीस ठाण्यात एका महिलेने फिनाइल पिऊन (drinking Phenyl) आत्महत्या करण्याचा प्रयत्न (suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.24) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी महिलेवर कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa police station) गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

आफरिन उमर शेख (वय-21 रा. नवाझिस पार्क, कोंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
तर कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार येनभाऊ साधु भिलारे (Yenbhau Sadhu Bhilare) (वय-56) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफरिन आणि तिच्या पतीमध्ये भांडण झाले होते.
पती महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे त्यांच्या वाद होत होते.
तसेच पत्नी आणि त्याच्या दोन मित्रांनी पतीला मारहाण (Beating) केली होती.
याची तक्रार देण्यासाठी तो पोलीस ठाण्यात आला होता.
पोलीस ठाण्यातील अमंलदार कक्षात तो तक्रार देण्यासाठी बसला असता पत्नी देखील त्या ठिकाणी आली.
तिने सोबत आणलेले फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न (commit suicide) केला.
पोलिसांनी तातडीने महिलेला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
सध्या तिच्यावर उपचार सुरु असून कोंढवा पोलीस तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Attempted suicide by a woman after drinking phenol at Pune police station

 

हे देखील वाचा :

Burglary in Pune | पुण्यात चोरट्यांचा धूमाकूळ, वारजे माळवाडीत 14 लाखांची घरफोडी

Mumbai Crime | अल्पवयीन विद्यार्थिनीला पॉर्न दाखवून केलं मास्टरबेट, शिक्षक ‘गोत्यात’

Property Card | आता घरबसल्याच मिळणार डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड, जाणून घ्या कोणाला होणार फायदा

 

Related Posts