IMPIMP

Pune Crime | प्रेमाचे नाटक करुन महिलेवर अत्याचार करुन केली मारहाण; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, सिंहगड रोड पोलीस ठाण्यात FIR

by nagesh
Aurangabad Crime | boyfriend sets himself on fire and hugs girlfriend incident in aurangabad

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | प्रेमाचे नाटक करुन तिच्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध (Physical Relationship) ठेवून त्याचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी (Threat) देण्याचा प्रकार समोर आला आहे. तिने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यावर तिला काठीने मारहाण (Beating) करण्यात आली. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी कर्वेनगरमधील (Karvenagar, Pune) एका ३६ वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४०६/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिासंनी नवनाथ भानुदास सस्ते Navnath Bhanudas Saste (वय ४०, रा. दांगट चाळ, वडगाव धायरी) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार आरोपीच्या घरी तसेच वडगाव धायरीमधील किर्तीनगर येथे २०२० पासून आतापर्यंत घडला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा चालक म्हणून काम करतो.
त्याने फिर्यादीस वारंवार माझे तुझ्यावर प्रेम (Love) आहे, असे सांगितले.
त्याला फिर्यादी यांनी नकार दिला असतानाही वारंवार फिर्यादीसोबत त्याने जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले.
त्याचा व्हिडिओ तयार करुन तो व्हायरल करण्याची धमकी दिली. २० सप्टेंबर रोजी फिर्यादी यांनी आरोपीला शरीरसंबंध ठेवण्यात नकार दिला असता त्याने फिर्यादीस काठीने मारहाण केली.
या घटनेनंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.
पोलीस उपनिरीक्षक लाड (Sub-Inspector of Police Lad) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Feigned love and assaulted a woman; Threat to make video viral, FIR in Sinhagad Road Police Station

 

हे देखील वाचा :

Pimpri Pune Crime | पत्नीचा खून करून पतीची गळफास घेत आत्महत्या, भोसरी परिसरातील घटना

CM Eknath Shinde On Shivsena | ‘शिवसेना कुणा कुटुंबाची प्रायव्हेट कंपनी नाही’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Congress | अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा नकार! आता ‘या’ दोन नेत्यांमध्ये रंगणार काँग्रेस अध्यक्षपदाची रस्सीखेच

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे तीन ‘डुप्लिकेट’, दोघेजण सापडले तर तिसऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरु

 

 

Related Posts