IMPIMP

Marathi Actress Sonali Kulkarni | मराठमोळी ‘हि’ अभिनेत्री आपल्या नवऱ्याबरोबर रमली शेतात, Video झाला व्हायरल

by nagesh
Marathi Actress Sonali Kulkarni | marathi actress sonali kulkarni enjoying tractor ride with husband in farming

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला (Marathi Actress Sonali Kulkarni) तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अशी ओळख मिळाली आहे. अभिनेत्री सोनाली तिच्या चित्रपटातल्या अभिनयातून त्याच बरोबर फोटोंमधून नेहमीच चर्चेत असते. सध्या ती कुटुंबीयांसोबत पंजाब (Punjab) मध्ये गेली आहे. तेथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Marathi Actress Sonali Kulkarni)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या व्हिडिओमध्ये सोनाली आपल्या नवऱ्यासोबत शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. (Sonali Kulkarni Enjoying Tractor Ride With Husband) हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शन मध्ये म्हटले की, “घर की खेती गेहू …… कुणालला आमचे शेत बघण्याची इच्छा होती त्यामुळे आम्ही याचा आनंद घेत आहोत”. अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये ती ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. त्याचबरोबर तिचा पती देखील तिच्यासोबत दिसत आहे. या आधीच सोनालीने पंजामध्ये वाघा बॉर्डरला भेट दिल्यानंतरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ते चाहत्यांना खूपच आवडले होते. या फोटोजनंतर आता सोनालीचा हा ट्रॅक्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ गाजवत आहे.

 

 

सोनालीचा नवरा कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) हा दुबईत (Dubai) स्थायिक असतो.
नुकताच त्यांचा विवाह सोहळा लंडन (London) येथे थाटामाटात पार पडला.
तर दुबईत साखरपुडा देखील जोरात पार पडला होता. ‘बकुळा नामदेव घोटाळे’ (Bakula Namdev Ghotale)
या चित्रपटातून सोनालीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
मराठी सोबतच हिंदी चित्रपट सृष्टीत देखील तिने आपले नाव कमावले आहे.
सोनाली मुळची पुण्याची (Pune) असून तिची आई पंजाबी असून वडील लष्करात होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Marathi Actress Sonali Kulkarni | marathi actress sonali kulkarni enjoying tractor ride with husband in farming

 

हे देखील वाचा :

Solapur ACB Trap | 2 हजार रुपयांची लाच घेताना शाखा अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Gajanan Kirtikar | ‘मला तोंड दाबून बुक्यांचा मार असह्य झाला आणि मी सेना सोडली’ – गजानन कीर्तिकर

Maharashtra Police Bharti 2022 | जाणून घ्या पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी आणि त्या संबंधीच्या अटी

 

Related Posts